मिरारोड (ठाणे) : पावभाजी, सॅन्डविच, दाबेली इत्यादी चमचमीत पदार्थ खाताना एक्ट्रा बटर लावण्याचा आग्रह अनेकजण करतात. मात्र तुम्ही खात असलेलं बटर बनावट असेल तर काय? असा प्रश्न पडण्याचं कारण काशिमिरा पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी बनावट बटर बनवणाऱ्या कंपनीवर कारवाई केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे.


ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात एका कंपनीत बनावट बटर तयार करण्याचं काम जोरात सुरु होतं. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक आयुक्त अतुल कुलकर्णी यांच्या टीमने धडक कारवाई केली. आपल्या टीमसह सहाय्यक आयुक्तांनी या कंपनीवर धाड टाकली.


या कारवाईत जवळपास हजार किलो बनावट बटर आणि अमूल बटरची पाकिटं जप्त करण्यात आली. याप्रकरणी कंपनीत काम करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी कंपनी सील केली असून चौकशी सुरु आहे.


या कंपनीत तयार केलेलं बटर अमूलच्या पाकिटात भरून बाजारात पुरवले जात असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. फास्ट फूड कॉर्नर, हातगाडीवरील खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल इत्यादी ठिकाणी हे बनावट बटर पुरवले जात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.



संबंधित बातम्या


मुंबईकरांचं चीज-बटर उस्मानाबादच्या जनावरांच्या कारखान्यातून?


खादाडखाऊ : अटर्ली बटर्ली पण फक्त डिलीशअस?


खादाडखाऊ : चायनीज गाड्यांवरचे खाणे आणि अर्थकारण


: उस्मानाबाद | मुंबईकरांचं चीज-बटर उस्मानाबादच्या जनावरांच्या कारखान्यातून? | एबीपी माझा