घरात कोंडून घेतलेल्या चोराला अटकेसाठी पोलिसांच्या विनवण्या

डोंबिवलीच्या पश्चिम भागातील जुनी डोंबिवली परिसरात ही घटना घडली आहे. या भागातील तुलसी विहार इमारतीतील एका बंद घरात एक चोरटा घुसला आणि कपाटातले सोन्याचे दागिने, लॅपटॉप चोरला. मात्र हा प्रकार आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आल्यानं त्यांनी घराबाहेर गर्दी केली.

Continues below advertisement

कल्याण : एका बंद घरात घुसलेल्या चोराने आजूबाजूचे लोक धुलाई करतील या भीतीनं स्वतःला घरातच कोंडून घेतलं. डोंबिवलीत हा प्रकार समोर आला आहे. या चोराला पोलिसांनी अटक केली आहे.

Continues below advertisement

डोंबिवलीच्या पश्चिम भागातील जुनी डोंबिवली परिसरात ही घटना घडली आहे. या भागातील तुलसी विहार इमारतीतील एका बंद घरात एक चोरटा घुसला आणि कपाटातले सोन्याचे दागिने, लॅपटॉप चोरला. मात्र हा प्रकार आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आल्यानं त्यांनी घराबाहेर गर्दी केली आणि चोराला पकडण्यासाठी सापळा रचला.

मात्र बाहेर पडलो, तर लोक बेदम चोप देतील, हे स्पष्ट होतं. त्यामुळे या चोरानं स्वतःला घरात कोंडून घेतलं. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांनाही या चोराला घराबाहेर काढण्यासाठी बऱ्याच विनवण्या कराव्या लागल्या.

अखेर सुरक्षेची हमी मिळाल्यावर हा चोर बाहेर आला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेलं. शब्बीर आलम शेख असं या चोराचं नाव असून त्याला विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे शब्बीर हा 31 जानेवारीला जेलमधून बाहेर आला आहे. त्यानंतर काही दिवसातच पुन्हा चोरी करताना तो पकडला गेला.

दरम्यान, जुनी डोंबिवली परिसरात मागील काही दिवसात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola