काशिमिरामधील तीन बारवर छापा, 33 बारबाला पोलिसांच्या ताब्यात
एबीपी माझा वेब टीम | 19 May 2016 02:07 PM (IST)
मीरारोड: मीरारोड येथील काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या तीन ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी काल रात्री छापा मारून कारवाई केली आहे. अश्लील गाण्यांवर डान्स करणाऱ्या ३३ बारबाला, हॉटेलमधील १८ कर्मचारी आणि ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावे लायसन्स घेऊन, बारबालाकडून डान्स करीत असल्याची माहिती काशिमिरा पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तीनही बारवर छापा टाकला. डान्सबारमध्ये चारच मुली ठेवण्यास परवानगी होती. मात्र या तीनही बारमध्ये चारपेक्षा अधिक मुली होत्या. काशिमीरा पोलीसांनी वेगवेगळ्या तीन टिम बनवून काशिमीरा हद्दीतील सनसिटी, के नाईट आणि ग्रीन चिली या बारवर एकाच वेळी छापा मारला. काशिमिरा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यां सर्वांवर कलम २९४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.