पोलिसांचा हलगर्जीपणा
पोलिसांनी या तपासात अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचं समोर येतं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल बारा तास लावले. शिवाय, कोपरा गावातील स्थानिक आरोपीला मदत करत असून, स्थानिक गुंडाच्या पीडित मुलीच्या पालकांना धमक्या येत आहेत.
पाळणाघरातील चिमुकल्यांना ड्रग्ज किंवा गुंगीचं औषध दिलं?
पाळणाघरातील चिमुकल्यांना काहीतरी ड्रग्ज किंवा गुंगीचं औषध दिलं जात असल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. कारण चिमुकलीला मारहाण होत असताना इतर लहान मुलं शांत, चिडीचूप झोपलेली दिसतात.
काय आहे घटना?
खारघर सेक्टर 10 मध्ये पूर्वा प्ले स्कूल आणि नर्सरी आहे. या ठिकाणी काही चिमुकली पाळणाघरात आहेत. पाळणाघरातील आया अफसाना नासीर शेख हिनं एका चिमुकलीला बेदम मारहाण केली. ज्यात मुलीच्या डोक्याला जखम झाली आहे. तिला उपचारासाठी वाशीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी खारघर पोलिसात आया अफसाना शेख आणि पाळणा घराची मालकीन प्रियांका निकमवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडेंकडून दखल
पाळणाघरात चिमुकलीला करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणाविषयी बोलताना मंत्री पंकजा मुंडेंनी संताप व्यक्त केला. ‘हा अतिशय घृणास्पद प्रकार आहे. हे पाळणाघर खासगी होतं की त्यासाठी त्यांनी कोणती परवानगी घेतली होती. याची चौकशी करण्यात येईल. तसेच इथं नियमांचं उल्लंघन झालं का याबाबतही चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान संबंधित महिलेवर कडक कारवाई केली जाईल. तेथील पोलीस अधिकाऱ्यांशीही बोलून मी स्वत: या प्रकरणात लक्ष घालणार आहे.’ अशी प्रतिक्रिया याप्रकरणी पंकजा मुंडेंनी दिली आहे.
व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
पाळणाघरातील प्रकार घृणास्पद, या प्रकरणात स्वत: लक्ष घालणार: पंकजा मुंडे
VIDEO: दहा महिन्याच्या चिमुकलीला पाळणाघरात अमानुष मारहाण