पालघर: पालघरचे प्रांताधिकारी शिवाजी दावभट आणि पालघरचे नायब तहसिलदार मनीवाडे सतीश केशव यांना तब्बल ५० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. 50 लाखांची रोकड घेताना एसीबीनं त्यांना अटक केली आहे.


एका जामिनीच्या प्रकरणी त्याच्या बाजूनं निवाडा करण्यासाठी ही लाच त्यांनी मागितली होती. दरम्यान, या प्रकरणी कारवाई करत ठाण्याच्या लाच लुचपत विभागाने प्रांतधिकारी शिवाजी दावभट, त्यांचा ड्रायव्हर आणि पालघरचे नायब तहसलिदारांना अटत केली आहे.

दरम्यान, एसीबीनं तिघांना अटक केली असून याप्रकरण्याची पुढील चौकशी सुरु आहे. एसीबीनं प्रांताधिकारी आणि नायब तहसिलदारांना अटक केल्यानं लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.