PM Narendra Modi Road Show In Mumbai: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 च्या (Loksabha Election 2024) पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान प्रकिया होणार आहे. यासाठी 4 दिवस राहिले असताना सर्वंच राजकीय पक्षांनी प्रचारात जोर लावल्याचे दिसून येत आहे. आज पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पहिले नाशिक आणि कल्याणमध्ये सभा, त्यानंतर मुंबईतील घटकोपरमध्ये नरेंद्र मोदींचा रोड शो आयोजित करण्यात आला आहे. (PM Narendra Modi Road Show In Mumbai)


नरेंद्र मोदींच्या मुंबईतील या 'रोड शो'बाबत मुंबई पोलिसांकडून विशेष सूचना जारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज मुंबईत होणारी रॅली तर 17 मे रोजी मुंबईत शिवतीर्थावर होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमिवर मुंबई पोलिसांकडून आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश आज पासून 17 मे च्या मध्यरात्रीपर्यंत लागू करण्यात आले आहे.


पाण्याची बॉटल, झेंडे, माचिस नेण्यास मनाई-


नरेंद्र मोदी यांचा आज घाटकोपरमध्ये रोड शो होत आहे. यासाठी पोलीस यंत्रणा अलार्ट मोडवर आहेत. संपूर्ण मार्ग बॅरीकेटिंग केलेली असली तरी ठिकठिकाणी रहिवासी वस्ती आणि रेल्वे स्थानकाला जोडणारे मार्ग आहेत. या मार्गावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना बॅग, पाण्याची बॉटल, झेंडे, माचिस, लायटर, नेलकटर , टोकदार, धारधार वस्तू , कॅमरे नेण्यास मनाई करण्यात आली आहे. या बाबतचे फलक मुंबई पोलीस या मार्गावर ठिकठिकाणी लावत आहेत


पोलिसांनी कोणते आदेश दिले?


विक्रोळी कांजूरमार्ग, पार्कसाईट, घाटकोपर, पंतनगर, टिळकनगर, चेंबूर, चुन्नाभटी, बीकेसी, खेरवाडी, वाकोला, विलेपार्ले, सहार, विमानतळ वाकोला, वांद्रे,  वरळी दादर आणि शिवाजी पार्क परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर, सर्व प्रकारचे फुगे, पतंग आणि रिमोर्ट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्टवर बंदी असणार आहे. 


मुंबईतील पुढील मार्गात बदल-


-अंधेरी घाटकोपर मार्ग वरील घाटकोपर जंक्शन ते साकीनाका जंक्शन दरम्यान उत्तर व दक्षिण वाहिनीवरील वाहतूक


-गोळीबार मैदान व घाटकोपर मेट्रो असताना जंक्शन येणारी वाहतूक


-हिरानंदानी कैलास कॉम्प्लेक्स येथून गुलाटी पेट्रोल पंप जंक्शन कडे येणारी वाहतूक 


असा असेल मोदींचा रोड शो


सायंकाळी 6.30 वाजता मोदी यांचे विक्रोळी येथे आगमन होईल. रोड शो हा 6.45 मिनिटांनी सुरू होऊन तो 7.45 ला संपेल. घाटकोपर पश्चिम येथे एलबीएस मार्गावरील दामोदर पार्क जवळील अशोक सिल्क मिल येथून हा रोड शो सुरू होऊन तो एम जी रोड वरून श्रेयस टॉकीज, सर्वोदय सिग्नल, संघवी स्केवर करत तो घाटकोपर पूर्व मध्ये रामजी असर शाळेजवळील पार्श्वनाथ मंदिर चौक येथे समाप्त होईल. 


नरेंद्र मोदींचा घाटकोपर- मुलुंड दौरा-


नरेंद्र मोदी त्यांच्या पहिल्या दौऱ्यात घाटकोपर ते मुलुंड असा रोड शो करणार आहेत. जिथं विद्यमान खासदार मनोज कोटक यांना तिकिट नाकारून मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. मिहिर कोटेचा यांची ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्याशी कडवी लढत होणार आहे. त्यामुळे या रोड शोचा फायदा मिहिर कोटेचा यांना होऊ शकतो. 


संबंधित बातमी:


Mumbai North East Lok Sabha Election : केंद्रातील सत्ता 'ठरवणारा' मतदारसंघ; ईशान्य मुंबईचा गड कोण सर करणार?