= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Narendra Modi Mumbai Visit: नरेंद्र मोदींचा गुंदवली ते मोगरापाडा दरम्यान मेट्रो प्रवास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबई मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं. त्यानंतर त्यांनी गुंदवली ते मोगरापाडा या दरम्यान मेट्रोचा प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी तरुण आणि महिलांशी संवाद साधला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Narendra Modi Mumbai Visit: डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास: नरेंद्र मोदी देशातील आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. देशातील रेल्वे स्टेशनही आता विमानतळांसारखी होऊ लागल्याचं पंतप्रधान म्हणाले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबईच्या विकासाला गती देणार: पंतप्रधान मोदी आज मुंबईच्या विकासाशी संबंधित 40 हजार कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. ते म्हणाले की, मुंबईच्या विकासाला गती देणार.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मविआच्या काळत राज्याचा विकास ठप्प झाला: मुख्यमंत्री मविआच्या काळत राज्याचा विकास ठप्प झाला, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
काहींना मेट्रोचं उद्घाटन मोदींच्या हस्ते करायची इच्छा नव्हती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींनी मेट्रोचं भूमिपूजन केलं तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते, काहींना मेट्रोचं उद्घाटन मोदींच्या हस्ते करायची इच्छा नव्हती. पण नियतीसमोर काही चालत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मोदींच्या व्यक्तीमत्त्वामुळे असं काही आहे की, जे आपल्याला उर्जा देतं : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या व्यक्तीमत्त्वामुळे असं काही आहे की, जे आपल्याला उर्जा देतं. येत्या दोन अडीच वर्षामध्ये या मुंबईचा कायापालट आपल्याला पाहायला मिळेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मोदींमुळे विकास कामना चालना मिळाली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचा विकास किती झाला ते आपल्याला माहिती आहे. अगदी ठप्प झालेल्या कामांना चालना देण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्याची संधी आम्हाला मिळाली ती केवळ नरेंद्र मोदींच्यामुळे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
20 वर्ष मुंबईवर राज्य करणाऱ्या केवळ स्वतःची घरं भरली: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ''20 वर्षे मुंबई पालिकेवर ज्यांनी राज्य केलं त्यांनी केवळ फिक्स डिपॉझिट केली. 20 वर्ष मुंबईवर राज्य करणाऱ्या केवळ स्वतःची घरं भरली'', असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पंतप्रधान मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पंतप्रधान मोदी मुंबई दाखल, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दाखल झाले असून विमानतळावर त्यांचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं. थोड्याच वेळात ते बीकेसीकडे रवाना होतील.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पंतप्रधान मोदी मुंबई विमानतळावर दाखल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू, थोड्याच वेळात होणार मुंबईत दाखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबई विमानतळावर थोड्याच वेळात आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पंतप्रधानांच्या सभेसाठी जबरदस्तीने फेरीवाल्यांना नेलं जातंय, ठाकरे गटाचा आरोप Mumbai : फेरीवाल्यांना जबरदस्तीने पंतप्रधान मोदींच्या सभेला घेऊन जात असल्याचा आरोप ठाकरे गटानं केला आहे. पालिकेच्या दक्षिण विभागाच्या अधिकाऱ्यावर हा आरोप करण्यात आला आहे. बसमध्ये बसून फेरीवाल्यांना घेऊन जात असल्याचे ठाकरे गटानं व्हिडीओ काढले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पंतप्रधान मुंबईत आलेत, आता मुंबई पालिकेची निवडणूक लागेल : रोहित पवार पंतप्रधान मुंबईत आले म्हणजे मुंबई पालिकेची निवडणूक लागेल असे वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे. इतर प्रोजेक्ट दुसऱ्या राज्यात जाण्यापेक्षा आणि आपल्या राज्यात कसे येतील यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा करावी असेही रोहित पवार म्हणाले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
PM Modi Mumbai Visit पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी कल्याण डोंबिवलीतून 2 हजारहून अधिक कार्यकर्ते दाखल होणार PM Modi Mumbai Visit : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील काही प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. त्यानंतर बीकेसी येथे पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. या सभेसाठी भाजपसह शिंदे गटाने देखील जय्यत तयारी केली आहे. सभेच्या निमित्ताने भाजप व शिंदे गट जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवलीमधून तब्बल 100 हून अधिक बसेस सभेसाठी रवाना होणार आहेत. यामधील कल्याण पूर्वेतून 40 डोंबिवली मधून 40 तर बसेस तसेच काही कार्यकर्ते खासगी गाड्यांनी मुंबई गाठणार आहेत. तब्बल दीड हजार कार्यकर्ते डोंबिवली कल्याण ग्रामीण तर दीड ते दोन हजार कार्यकर्ते कल्याणमधून मुंबई येथे धडकणार आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी गिरगावात पोस्टरबाजी PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी गिरगावात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचे गिरगावत पोस्टर लागले आहेत. या पोस्टरमध्ये मोदी बाळासाहेबांचा हात हातात घेऊन वाकून नमस्कार करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत. गिरगांव येथे बाळासाहेब ठाकरे आणि मोदी यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. यामध्ये बाळासाहेबांच्या पुढे मोदींची मान झुकते असे पोस्टर लावण्यात आलेले आहेत. आज मुंबईमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा आहे. त्या पार्श्वभूमीवर हे पोस्टर अज्ञाताने लावले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भाजप-शिंदे गटाकडून पंतप्रधान मोदींच्या सभेची जय्यत तयारी PM Modi Mumbai Visit : मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीनं आणि भाजप-शिंदे गटाकडून मोदींच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोदींच्या हस्ते बीकेसी मैदानात मुंबईतील विविध विकासकामांचं भूमिपूजनही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी बीकेसी मैदानात तीन व्यासपीठं उभारण्यात आली आहेत. त्यात मुख्य स्टेजवर पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर नेते असतील. दुसऱ्या स्टेजवर अवधूत गुप्ते यांच्या संगीताचा कार्यक्रम होईल. तर तिसऱ्या स्टेजवर भाजप आणि शिंदे गटातील आमदारांची व्यवस्था करण्यात आली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पंतप्रधान मोदींच्या हस्ते 38 हजार 800 कोटींच्या विकासकामांचं लोकापर्ण होणार PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते ३८ हजार ८०० कोटींच्या विकासकामांचं लोकापर्ण आणि काही कामांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्तानं, काही वर्षांपासून रखडलेल्या आणि मुंबईसाठी महत्वाच्या असणाऱ्या प्रकल्पांना गती देण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न आहे. मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी मैदानावर आज मोदींची सभा पार पडणार आहे. यावेळी मोदी काय भाषण करतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय... मोदींच्या या सभेसाठी २५० हून अधिक बस बूक कऱण्यात आल्यात. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातून या एसटी बस मुंबईत दाखल होतील. मोदींच्या या दौऱ्याच्या निमित्तानं भाजप आणि शिंदे गटाकडून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिक-ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलीये.