PM modi mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 तारखेला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा हा मुंबईकरांसाठी खास असणार आहे. कारण या दौऱ्यात मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आणि तितक्याच गरजेच्या विकास कामांचा शुभारंभ आणि प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे...हे प्रकल्प मुंबईचा कायापालट करणारे तर आहेतच... शिवाय मुंबईला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे आहेत...त्यामुळे पाहुयात, अशा कुठल्या महत्वाच्या प्रकल्पांचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार आणि मुंबईचा कायापालट यामुळे कसा होणार ?  


 मुंबईतील मेट्रो 7 आणि मेट्रो 2A ला पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा...


मुंबईच्या 400 किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करण्याच्या प्रकल्पाचा होणार मोदींच्या हस्ते भूमिपूजन....


मुंबईतील 7 मलजल प्रक्रिया केंद्राचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन...


महापालिकेचे 20 रुग्णालय, भांडूप मल्टिस्पेशालिटी रुग्णालय, गोरेगाव सिद्धार्थ रुग्णालय आणि ओशिवरा प्रसूतिगृह या सगळ्यांचा मोदींच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण...


प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत मुंबईतील १ लाख  फेरीवाल्यांना मोदींच्या हस्ते थेट लाभ वितरण...


मुंबईतील असे अनेक महत्वकांक्षी आणि रखडलेल्या प्रकल्पांचा शुभारंभ मोदींच्या तीन साडे तीन तासांच्या दौऱ्यात होणार आहे


आता ज्या प्रकल्पांचा उदघाटन होणार आहे त्यातले काही प्रकल्प हे अनेक वर्षांपासून रखडले होते...यामध्ये अशी सुद्धा काही विकास कामे आहेत ज्याची गरज मुंबईकरांना होती...मात्र त्यावर विचारच होऊ शकला नाही... आणि याच विकासकामांच्या सुरू होण्याने मुंबई बदलणार आहे... ती विकास काम समजून घेऊयात...


यामध्ये महत्वाचं म्हणजे-


मुंबईतील 400 किमी रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरण होऊन खड्डे मुक्त मुंबई पाहायला मिळणार-


मुंबईतील रस्त्याची स्थिती दाखवत - मुंबईतील 400 किमी चे रस्ते सिमेंट काँग्रेसचे होणार मुंबईतील रस्ते पुढील दोन ते तीन वर्षात खड्डे मुक्त होणार... यासाठी सहा हजार कोटींचा खर्च केला जाणार असून राष्ट्रीय महामार्ग रस्ते कामाचा अनुभव असलेल्या कंपन्यांकडून मी काम केलं जाणार - वेदांत


मेट्रो लाईन 7 आणि 2 A चा शुभारंभ होऊन पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होणार


 मुंबईतील पश्चिम उपनगरात राहणाऱ्या नागरिकांची वाहतूक मेट्रो लाइन 7 आणि 2A सुरू करून कोंडीतून काही प्रमाणात सुटका...प्रवास सुखकर आणि जलद होणार - अक्षय केला आहे


मलजल प्रक्रिया केंद्राची उभारणी करून पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे आणि पाण्याचा पुनर्वापर करणे शक्य होणार आहे,.


मागील दहा ते पंधरा वर्षापासून रखडलेल्या मलजल प्रक्रिया केंद्राची उभारणीचा भूमिपूजन होणार आहे.
बीएमसीकडून वरळी, वांद्रे, मालाड, घाटकोपर, धारावी, भांडुप आणि वेसावे अशा एकूण ७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार
मागील दहा ते पंधरा वर्षापासून रखडलेल्या प्रकल्पाचा खर्च दहा हजार कोटींवरुन 26 हजार कोटींवर गेला आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे शक्य होईल.
सातही मलजल प्रक्रिया केंद्रांची उभारणी पूर्ण झाल्यानंतर एकूण २,४६४ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेने मलजलावर प्रक्रिया होऊन त्याचा पुनर्वापर शक्य होणार आहे. 


मुंबईत आरोग्य यंत्रणेचा जाळ आणखी मजबूत करण्यासाठी , अद्यावत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी रुग्णालयांची भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा


मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत वीस दवाखान्यांचा लोकार्पण केलं जाणार आहे...
आतापर्यंत 66 ठिकाणी रुग्णालय कार्यरत,दोन लाखांपेक्षा अधिक मुंबईकरांनी या दवाखान्यांचा लाभ घेतलाय.
मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यासह १४७ प्रकारच्या रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 
या व्यतिरिक्त क्ष-किरण (एक्स-रे), सोनोग्राफी इत्यादी चाचण्यांकरिता पॅनलवरील डायग्नॉस्टिक केंद्रांद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दरात संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. 
 याशिवाय भांडुप मध्ये सुपर स्पेशलिटी रुग्णालयाचे भूमिपूजन करून अद्यावत आरोग्यसेवा पुरवली जाईल.


त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात आरोग्य सेवा असो किंवा मग मुंबईतील रस्ते तसेच सांडपाण्याचा प्रश्न किंवा मग वाहतूक कोंडी वरचा पर्याय... या सगळ्यातून मुंबईचा विकास साधण्याचा प्रयत्न या सर्व लोकार्पण आणि भूमिपूजन केल्या जाणाऱ्या प्रकल्पातून होणार आहे..त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा खऱ्या अर्थाने मुंबईच्या आणि अर्थातच मुंबईकरांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून गरजेचे असलेल्या प्रकल्पांच्या शुभारंभासाठी महत्त्वाचा आहे... मात्र या प्रकल्पांचे नुसतं भूमिपूजन करून होणार नाही तर याचा प्रत्यक्ष फायदा मुंबईकरांना लवकरात लवकर होईल, अशा दृष्टीने नियोजन करणे सुद्धा तितकच महत्त्वाचा असेल तरच खऱ्या अर्थाने मुंबईचा या प्रकल्पामुळे कायापालट होईल.