PM Modi Speech LIVE: कोणताही भेदभाव न करता विक्रमी लसीकरण करुन दाखवलं - पंतप्रधान मोदी

PM Modi To Address Nation Today: काल देशानं कोरोना लसीकरणात एक महत्वाचा टप्पा पार केला. या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजता संबोधित करणार आहेत.

abp majha web team Last Updated: 22 Oct 2021 10:14 AM

पार्श्वभूमी

PM Modi To Address Nation Today: काल देशानं कोरोना लसीकरणात एक महत्वाचा टप्पा पार केला. देशानं 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडला आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स...More

अनेक संस्था भारतामधील अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक

तज्ज्ञ आणि देश-विदेशातील अनेक संस्था भारतामधील अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक आहेत. भारतातील कंपनीमध्ये गुंतवणूकदार वाढत आहेत. त्याशिवाय रोजगारही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहे. स्टार्टअपमध्ये मोठी गुंतवणूक सुरु आहे. मेड इन इंडियाची ताकद सर्वात मोठी आहे. स्वच्छ भरात अभियानाप्रमाणेच ocal for Local चाही नारा द्यायला हवा. भारतात तयार झालेल्या अथवा भरातीयांनी तयार केलेल्या गोष्टी खरेदी करायला हव्यात. मेड इन इंडियावर भर द्यायला हवा. हे सर्व भारतीयांच्या सहभागानंतरच यशस्वी होईल.