नवी मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पनवेल येथील पिल्लई अभियांत्रिकी महाविद्यालय आणि रिलायन्स इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने बायोक्रक्स निमिर्ती प्लास्टिक बाटल्या पुनर्संस्करण करणारे यंत्र बसविण्यात आले आहेच. पिल्लई अभियांत्रिकी महाविद्यालयाला महाराष्ट्रातील पहिले यंत्र बसवणारे महाविद्यालय असल्याचा मान मिळवला आहे.


अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असे यंत्र महाविद्यालयाच्या परिसरात स्थापन केले आहे. आता हा प्लास्टिक मुक्त कॉलेज परिसर म्हणून ओळखला जाईल. पेटवेस्ट पेट बॉटल्स यांचे सर्वबाजूनी प्रक्रिया उपकरणे बनवणारी भारतातील पहिलीच संशोधक कंपनी आहे.

या महाविद्यालयात शिकणाऱ्या भावी अभियंतांना या प्रकल्पाचे महत्त्व प्रात्यक्षिकपणे जाणून घेण्याची संधी लाभली आहे. या यंत्राचे उद्घाटन पनवेल पालिका आयुक्त डॉ . गणेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कॉलेज चेअरमन डॉ. के. एम. वासुदेवन उपस्थित होते. असा उपक्रम वसाहतीतसुध्दा राबिवण्यात यावा असे आवाहन पनवेल आयुक्तांनी केले आहे.