मुंबई : मुंबईसह राज्याभरात कोरोनानं थैमान घातलेलं पाहायला मिळत आहे. मात्र मुंबईतील कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्याचे एक प्रमुख केंद्र असलेल्या कस्तुरबा रुग्णालयात अस्वच्छतेचं साम्रज्य असून इथं घुशी, मांजरींचा वावर असल्याचा आरोप करत एका वकिलाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच येथील स्वच्छतागृहातही कमालीची अस्वच्छता असल्याचे दाखवणारे काही फोटोही या आरोपांचा पुरावा म्हणून त्यांनी खंडपीठाला दाखवले. तसेच कस्तुरबाच्या क्वारंटाइन वॉर्डमध्ये असलेल्या रुग्णांना आरोग्यदायी आहारही मिळत नसल्याचा आरोप करताना जेवणाच्या ताटाचे काही फोटो आणि रुग्णालयाचा डाएट चार्टही त्यांनी दाखवला. मात्र, चार्ट पाहून तो प्रथमदर्शनी योग्यच असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवत या अर्जावर सोमवारी सुनावणी निश्चित केली आहे.

Coronavirus | कोरोनाशी लढण्यासाठी राज्य सक्षम, केंद्राला निधी मागण्याची आवश्यकता नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार



देशभरात करोनोच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जनता कर्फ्यू, वर्क फ्रॉम होमच्या घोषणा झाल्या. मात्र मुलभूत वैद्यकीय सोयी सुविधांचं काय?, मुंबईसह राज्यातील कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्याचे मुंबईतील प्रमुख केंद्र असलेल्या कस्तुरबा रुग्णालयात आजही अस्वच्छतेचं साम्रज्य असून तिथं उंदीर, घुशी आणि मांजरींचा वावर असल्याचा आरोप करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. तेव्हा याबाबत रुग्णालय प्रशासनाला निर्देश देण्याची विनंती याचिकाकर्ते अॅड. सागर कुर्सिजा यांनी केली आहे. शुक्रवारी यावर मुख्य न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर कोरोना संदर्भातील सुनावणीदरम्यान निदर्शनास आणूण दिले.

coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांची गती वाढविण्याची आवश्यकता, मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधानांना विनंती


देशभरात सध्या करोनाचा वेगानं फैलाव होत आहे. महाराष्ट्र यात अग्रेसर असून मुंबईत कोरोना विषाणूची अनेकांना बाधा झाली आहे. त्या साऱ्यांवर कस्तुरबा रुग्णालयाच्या 'आयसोलेशन वॉर्ड'मध्ये उपचार सुरू आहेत. 'करोना'चा अटकाव करण्यासाठी स्वच्छता हा प्रमुख मार्ग असून त्यात वैयक्तिक स्वच्छतेबरोबर आसपासच्या परिसराची स्वच्छताही महत्त्वाची आहे. मात्र, जिथं करोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत, त्या रुग्णालयातच अस्वच्छता असून तिथे घुशी व मांजरींचा सर्रास वावरत असल्याचे याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात सांगितले.