पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र पेट्रोल पंप, सीएनजी पंप यासारख्या काही महत्त्वाच्या ठिकाणी 11 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत पाचशे आणि हजारच्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत. मध्यरात्री 12 वाजल्यानंतर मात्र पाचशे आणि हजारच्या नोटा घेतल्या जाणार नाहीत.
त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सुट्ट्या पैशांवरुन ग्राहकांसोबत खटके उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य वाद टाळण्यासाठी मुंबई पेट्रोल डिझेल असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे.