मुंबई: दहीहंडीसंदर्भात कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी राज ठाकरेंविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिक सादर करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी ही याचिका सादर केली आहे.

 

स्वाती पाटील यांची ही याचिका दाखल करुन घ्यायची नाही याचा निर्णय येत्या 20 सप्टेंबर रोजी होणार आहे. कोर्टानं घालून दिलेल्या नियमांचं जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याचा आरोप स्वाती पाटील यांनी याचिकेत केला आहे. त्यामुळं 20 सप्टेंबर रोजी स्वाती पाटील यांची याचिका दाखल करुन घेतली जाते का याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

 

दरम्यान, ठाण्यातील नौपाड्यात मनसेने कायदेभंग दहीहंडीचं आयोजन केलं होतं. नऊ थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला 11 लाखांचं बक्षीस मनसेतर्फे जाहीर करण्यात आलं होतं. जय जवान मंडळाने 9 थरांची सलामी दिली. यावेळी पोलिसांनी कुणालाही रोखलं नाही. मात्र, कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केल्याप्रकरणी मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला.

 

संबंधित बातम्या:

 

लगोरीचे किती थर लावायचे कोर्टाला विचारा, राज ठाकरेंचा सल्ला


जेवणात लुडबूड नको, मांस विक्री दुकानं सुरु ठेवा, राज ठाकरेंनी ठणकावलं