ठाणे : ठाण्यात 18 नोव्हेंबरला होणाऱ्या राज ठाकरेच्या सभेची जागा निश्चित झाली आहे. कालच अमित ठाकरे यांनी ठाण्यात येऊन जागेची पाहणी केली.
राज ठाकरेंची सभा गडकरी रंगायतन समोरील रस्त्यावर सभा निश्चित करण्यात आली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नौपाडा पोलिसांची भेट घेतल्यानंतर गडकरी रंगायतन येथील सभेला पोलिसांनी हिरवा कंदील दिला आहे.
सुरुवातीला राज ठाकरे यांची सभा ठाणे स्टेशन परिसरात घेण्याचे ठाणे मनसैनिकांनी निश्चित केले होते. तेव्हा सभेला परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र, याच ठिकाणी सभा व्हावी यासाठी मनसैनिक प्रयत्नशील होते. दरम्यान, सोमवारी मनसे पदाधिकारी आणि पोलीस वरिष्ठ अधिकारी यांच्याक एक बैठकही झाली. त्यानंतर सोमवारी रात्री राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी ठाण्यात येऊन सभेच्या जागेची पहाणी केली. त्यानंतर या जागेला पोलिसांकडून परवानगी देण्यात आली.
ठाण्यातील राज ठाकरेंच्या सभेच्या जागेला अखेर पोलिसांकडून परवानगी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Nov 2017 08:43 PM (IST)
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नौपाडा पोलिसांची भेट घेतल्यानंतर गडकरी रंगायतन येथील सभेला पोलिसांनी हिरवा कंदील दिला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -