पालघर : अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा असल्या तरी आता त्यात मोबाईल चार्जिंगही भर पडली आहे. सध्याच्या काळात एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे मोबाईल. पण मोबाईलसह तो चार्जिंगही आपली मूलभूत गरज बनली आहे.
मुसळधार पावसामुळे विरारमध्ये गेले 30 तास वीजपुरवठा नाही. त्यामुळे आज नागरिक जेव्हा विरार स्टेशनला पोहोचले, तेव्हा ट्रेन येत नव्हत्या. ट्रेनची वाट पाहण्याच्या वेळेचा सदुपयोग करत, नागरिकांनी विरार सब-वेमध्ये मोबाईल फोन चार्ज केला. सब-वेमध्ये फोन चार्ज करण्यासाठी एकच झुंबड उडाली होती.
सलग चार दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरारमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. घरातील सामान संपल्याने वसई-विरारकरांवर आणीबाणीची परिस्थिती ओढावली आहे.
वसईच्या सबस्टेशनमधील कंट्रोल रुममध्ये पाणी साचल्याने वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हे कमी काय म्हणून मोटर चालू नसल्याने पाणी वर न चढल्याने रहिवाशांना खालून पाणी भरावं लागत आहे.
मोबाईल चार्ज नसल्याने कोणाचेही संपर्क होत नाहीत. मोबाईलचं नेटवर्क बंद आहेत. त्यामुळे विरार सब-वेवर चार्जिंगची सुविधा मिळाल्यानंतर नागरिकांनी मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी एकच गर्दी केली.
दरम्यान, वसई-विरारमधील वीज पुरवठा अडीच तासात सुरु होईल, अशी माहिती एमएसईबीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. महावितरण आणि महापारेषणची टीम वसई-विरार परिसराचा वीज पुरवठा सुरु करण्यास युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत.
वसई-विरारमध्ये बत्ती गुल, मोबाईल चार्ज करण्यासाठी स्टेशनवर झुंबड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Jul 2018 02:00 PM (IST)
सलग चार दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरारमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. घरातील सामान संपल्याने वसई-विरारकरांवर आणीबाणीची परिस्थिती ओढावली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -