मुंबई: राज्याचा अर्थसंकल्प आज विधीमंडळात सादर झाला. मात्र, यावेळी विरोधकांनी सभागृहात अभूतपूर्व गोंधळ घातला. अर्थमंत्री मुनगंटीवार हे बजेट मांडत असताना विरोधकांनी संपूर्ण वेळ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी टाळ वाजवून आंदोलन केलं. यामुळे अर्थमंत्र्यांना बजेट मांडत असताना वारंवार अडचणी येत होत्या. विरोधकांच्या या गोंधळावर नंतर मुख्यमंत्र्यांनी सडकून टीका केली.


आज विरोधकांनी जो गोंधळ घातला त्यावर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली. ‘विरोधकांचं आजचं वागणं हे लोकशाहीला साजेसं अजिबात नव्हतं, तर लोकशाहीची थट्टा करणारं होतं. विरोधक शेतकऱ्यांसाठी आले होते की, थट्टा मस्करी करायला?,’ अशी टीका करत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

‘विरोधी पक्ष पूर्णपणे अस्वस्थ झाला आहे. नेमकं काय करावं हे त्यांना कळत नाही. निवडणुकीत मार खातात. जनतेचा यांच्यावर विश्वास नाही.’ असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी हाणला.

‘काही राजकीय पक्षांना वाटत होतं की, शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून बंदूक चालवता येईल. पण तो खांदा त्यांना मिळाला नाही.’ असा टोमणाही मुख्यंमंत्र्यांनी यावेळी लगावला.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्र्यांमुळे विरोधकांचा डाव फसला, शिवसेनेवर मात्र नामुष्की