पनवेलमधील शाळेकडून विद्यार्थिनींचा मानसिक छळ
एबीपी माझा वेब टीम | 12 Aug 2016 06:34 PM (IST)
पनवेल: एकीकडे देशाचे पंतप्रधान 'बेटी बचाव, बेटी पढाव'चा संदेश देत आहेत. तर दुसरीकडे काही शाळांनीच या मोहिमेला हरताळ फासायला घेतला आहे. शाळेनं लादलेली बेकायदेशीर फी भरण्यास पालकांनी नकार दिला म्हणून, शाळेनं विद्यार्थिनीचा मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पनवेल जवळच्या खांदा कॉलनीतील सेंट जोसेफ शाळेत हा प्रकार घडला आहे. खुशी सुकुम या विद्यार्थिनीला शाळेच्या रोशाला सामोरं जावं लागतं आहे. या प्रकरणी खुशीच्या वडिलांनी शाळेच्या उपसंचालकाकडे तक्रार केली आहे. दरम्यान, शाळेच्या मुख्याध्यापकांनी या संपूर्ण प्रकरणावर कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे.