मुंबई : पनवेल-सीएसएमटी जलद रेल्वेमार्ग, विरार-गोरेगाव उन्नत रेल्वेमार्गांबाबत लवकरात सुरु प्रक्रिया सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे मुंबईकरांचा वेग आणखी वाढणार आहे.


याशिवाय मेट्रो 4 चे आणखी पुढे दोन स्टेशन वाढवण्यात येणार आहेत. वडाळा-घाटकोपर-तीन हातनाका-कासारवडवली हा मेट्रोचा मार्ग होता, आता तो पुढे गायमुखपर्यंत वाढवला जाणार आहे. पियुष गोयल, रेल्वे अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री, पियुष गोयल आणि- रेल्वे अधिकारी यांच्या बैठकीतील निर्णय

  • MUTP 3 मधील प्रकल्पबाबत लवकरात लवकर निर्णय घेत प्रक्रिया सुरू केली जाईल

  • पनवेल-सीएसएमटी जलद रेल्वे मार्ग, विरार - गोरेगाव उन्नत रेल्वे मार्ग, पनवेल - कर्जत अतिरिक्त रेल्वे मार्ग

  • डोंबिवली, कल्याण अशा अधिक गर्दीच्या रेल्वे स्थानकांची स्थिती सुधारवण्याबाबत निर्णय

  • रेल्वेच्या हद्दीत असलेली घरे, झोपड्या यांना पर्यायी SRA अंतर्गत घरे दिली जाणार, पुनर्वसनाचा प्रश्न मिटेल, रेल्वेची जागा मोकळी होईल, जी रेल्वेला वापरता येईल. हा निर्णय याआधी झाला होता. लवकरच अंमलबजावणीला सुरुवात करणार.

  • MMRDA बरोबरच्या बैठकीत बीकेसी प्रमाणे वडाळा विकसित हब करण्याचा निर्णय झाला. वित्तीय केंद्र, integrated transport hub करण्याचा निर्णय

  • भाईंदर हे खाडीवरील पुलाचे वसई - विरार भागाला जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

  • वडाळा - घाटकोपर - तीन हात नाका - कासारवडवली ही मेट्रो 4A पुढे गायमुखपर्यंत वाढवली जाणार