पायानं मळलं जातं पाणीपुरीच्या पुरीचं पीठ, धक्कादायक दृश्य कॅमेऱ्यात कैद
एबीपी माझा वेब टीम | 28 Oct 2016 08:20 PM (IST)
कल्याण: गोल गरगरीत पुरी आणि चमचमीत पाणी सगळ्यांनाच आवडतं. मात्र, ही पुरी कशाप्रकारे बनवली जाते. हे पाहिलं तर पाणीपुरी खाताना तुम्ही नक्कीच दोनदा विचार कराल. कल्याण पूर्वेतील कर्पेवाडी परिसरातल्या पुरी बनवण्याच्या कारखान्यात अतिशय घाणेरड्या पद्धतीनं पुरीचं पीठ मळलं जातं. चार ते पाच मुलं या पिठावर नाचत असल्याचं दिसून आलं आहे. याच पिठाच्या पुऱ्या बनवल्या जातात. हे पीठ आरोग्यासाठी घातक असून अशाप्रकारे पुऱ्या बनवणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येते आहे. त्यामुळे खिशाला परवडणारी ही पाणीपुरी खाणाऱ्या खवय्यांना आता सावधानता बाळगावी लागणार आहे . VIDEO: