मुंबई : सचिन वाझे प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी काही दिवसांपूर्वीच गृह विभागाला अहवाल सादर केला आहे. पोलीस आयुक्तांच्या अहवालानंतर परमबीर सिंह यांच्या चौकशीचे आदेश सरकारचे आदेश दिले आहेत. पोलीस महासंचालक संजय पांडे यांना प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे चौकशीत परमबीर सिंह दोषी आढळल्यास राज्य सरकारकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांनी 30 मार्चला अहवाल दिल्यानंतर 1 एप्रिलला चौकशीबाबत आदेश निघाले होते. मुंबई पोलीस आयुक्तांच्या अहवालात परमबीर सिंह यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
कोणत्या मुद्द्यांवर परमबीर सिंह यांची बदली होणार?
- सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्यातील संबंधवर होणार चौकशी
- अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरणात परमबीर सिंह यांनी आपल्या अधिपत्याखालील अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात कसूर केली का?
- या स्फोटक प्रकरणी अधिवेशन सुरू असताना तातडीने राज्य सरकारला अहवाल सादर करण्यात परमबीर सिंह यांनी निष्काळजीपणा दाखवला का?
- परमबीर सिंह यांनी लिहिलेले पत्र प्रसारमाध्यमात प्रसिद्ध झालं, त्यामुळे शासनाची प्रतिमा मलिन झाली.
- पत्रव्यवहार विहित मार्गाने करण्यात आलेला नाही. हे करून परमबीर सिंह यांनी अखिल भारतीय सेवा नियमांचा भंग केला आहे का?
- उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात शासनास प्रतिवादी करून याचिकेत सीबीआयमार्फत तपास करण्याची मागणी केली. या बेशिस्त कृतीमुळे अखिल भारतीय सेवा नियमांचा भंग झाला का?
- अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात स्फोटक प्रकरणी पूर्ण आणि अचूक माहिती सरकारला देण्याच्या कर्तव्यात कसूर केली आहे का?
संबंधित बातम्या