Orange Gate-Marine Drive Double Tunnel Project मुंबई: मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पातील भुयारीकरणाच्या (Orange Gate-Marine Drive Double Tunnel Project) कामाला अखेर आज पासून सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. यावेळी ऑरेंज गेट येथील लॉन्चिंग शाफ्ट येथून पहिले टनेल बोअरिंग यंत्र (टीबीएम) भूगर्भात सोडण्यात येणार आहे. या टीबीएमच्या माध्यमातून ऑरेंज गेट-मरीन ड्राईव्ह दरम्यान भुयारीकरण केले जाणार आहे. एमएमआरडीए अध्यक्ष असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर हा फडणवीस आणि शिंदे यांचा पहिलाच एकत्रित कार्यक्रम आहे.

Continues below advertisement

चेंबूरहून सीएसएमटीपर्यंत पूर्व मुक्त मार्गाने अतिवेगाने आल्यानंतर मरीन ड्राईव्ह, चर्चगेटकडे जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीत अडकावे लागते. हीच वाहतूक कोंडी दूर करून चेंबूर-मरीन ड्राईव्ह असा थेट प्रवास अतिवेगवान करण्यासाठी एमएमआरडीएने ऑरेंज गेट-मरीन ड्राईव्ह दरम्यान दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला आहे. 9.2 किमी लांबीच्या या दुहेरी बोगद्यासाठी 9158 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा बोगदा मुंबई सागरी किनारा मार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे दुहेरी बोगद्यावरून येणाऱ्या वाहनांना पुढे पश्चिम उपनगरांकडे जाणेही सोपे होईल.दोन टीबीएम यंत्राद्वारे भुयारीकरण करण्यात येणार आहे.

ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह शहरी बोगदा प्रकल्पाची माहिती- (Orange Gate-Marine Drive Double Tunnel Project)

मुंबई महानगर क्षेत्रातील वाढती वाहतूक मागणी आणि वाहतुकीच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह या मुंबई शहरातील भूमिगत रस्त्याचे बांधकाम हाती घेतले आहे. 

Continues below advertisement

प्रकल्पाचा खर्च: ₹ 8056 कोटी 

पूर्णत्वाचा कालावधी: 54 महिने 

प्रकल्पाचे मुख्य फायदे- (Orange Gate-Marine Drive Double Tunnel Project)

मुंबईतील पूर्व-पश्चिम उपनगरे आणि नवी मुंबई या भुयारी मार्गाद्वारे जोडली जाईल.

प्रवासाचा वेळ 15-20 मिनिटांनी कमी होईल.

इंधनाची बचत होईल.

तसेच ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

प्रकल्पाचा तपशील- (Orange Gate-Marine Drive Double Tunnel Project)

हा भारतातील पहिला शहरी बोगदा प्रकल्प असून तो घनदाट लोकवस्ती असलेल्या भागाखालून तसेच मध्य, पश्चिम रेल्वे आणि मुंबई मेट्रो लाईन 3 (ॲक्वा लाईन) च्या  50 मी. खालून जातो.

प्रकल्पाची एकूण लांबी 9.96 किमी आहे, ज्यामध्ये जवळपास 7 किमी भुयारी मार्ग आहे.

प्रत्येक बोगद्यात 3.2 मीटर रुंदीचे 2 पदरी रस्ते, 1 पदरी आपत्कालीन रस्ता असेल. दोन्ही बोगद्यांमध्ये वेग मर्यादा वेग 80 किमी/तास इतकी असेल.

दोन्ही बोगदे सुरक्षिततेच्या दृष्टीने एकमेकांशी प्रत्येकी 300 मी. अंतरावर क्रॉसपॅसेजद्वारे जोडले जातील.

बोगद्यांमध्ये हवा खेळती राहण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या क्षमतेचे यांत्रिकीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. आग प्रतिरोधक यंत्रणा, पुरेश्या प्रमाणात प्रकाश व्यवस्था, सुयोग्य व आधुनिक पध्दतीने वाहतूक विनिमयासाठी इन्टीलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टम (ITS) इत्यादी बाबींचे प्रयोजन आहे.

प्रकल्पाच्या जमिनीखालील संरेखनामुळे भू-संपादन कमी होते, शहरी वातावरण जपते आणि शहरात कमीत कमी व्यत्यय सुनिश्चित करते.

सदर प्रकल्प हा मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि अटल सेतू सारख्या प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांशी जोडला जातो.

बोगद्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान- (Orange Gate-Marine Drive Double Tunnel Project)

या प्रकल्पासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा स्लरी शील्ड प्रकारची टनेल बोरिंग मशीन (Slurry Type TBM) असून, ही उच्च तंत्रज्ञानावर आधारित आणि मुंबईच्या किनारी भूगर्भातील मिश्र व खडकाळ भूस्तराकरीता अचूक व सुरक्षित खोदकाम करणारी यंत्रणा आहे.

हे तंत्रज्ञान मुंबई कोस्टल रोड प्रकल्पात देखील वापरण्यात आले असल्याने कार्यक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे.

टनेल बोरिंग मशीन (TBM)-

प्रकल्पासाठी वापरले जाणाऱ्या टीबीएमचे नूतनीकरण आणि पुनर्निर्मितीची कामे स्थानिक पातळीवर मूळ टनेल बोरिंग मशीन उत्पादक (OEM) यांचा देखरेखीत करण्यात आले आहे.

कटर हेड व्यास: 12.19 मीटर-लांबी: 82 मीटर-वजन: अंदाजे 2, 400 मेट्रिक टन.

प्रकल्पाची सद्यस्थिती- (Orange Gate-Marine Drive Double Tunnel Project)

सद्यस्थितीत प्रकल्पाची भौतिक प्रगती 14% आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO: