मुंबई : राज्यभरात ओखी वादळाचा परिणाम दिसू लागला आहे. अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून मोठ्या लाटा उसळण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

ओखी चक्रीवादळाच्या तडाख्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आज मुंबईसह परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र अशा परिस्थितीतही अनेकांच्या क्रिएटिव्हिटीला अर्थात प्रतिभेला धुमारे फुटले आहेत.

राज्यभरात अवकाळी पावसाचा वर्षाव होत असताना, फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियावर पावसावरील ज्योक्सचा वर्षाव होत आहे. राज्य सरकारच्या मी लाभार्थी जाहिरातीचा वापर करुन अनेक खुमासदार आणि खुसखुशीत मेसेज शेअर केले जात आहेत.

काही निवडक मेसेज
शाळेतल्या मुलांना

आणि

सरकारी कामगारांना

सुट्टी देताय

मग आम्ही

प्रायवेट वाले

काय सुपरमॅन आहोत ?
😜😜

----------------

-----------------

अशोक सराफ यांनी चक्रीवादळ बाबत पूर्वीच भविष्यवाणी केली होती... (धुमधडाका)

.

.

.

.

.

विख्खी व्याख्ख्या ओख्खी

-----------------

पूर्वीच्या पिढीपेक्षा 🌧🌨🌦 आताची पिढी जास्त पावसाळे ☔ पाहतेय...! 😜

पुन्हा पावसाळा आला...
आता दिवाळी येणार.. परत बोनस.
होय हे माझ सरकार  ...आम्ही लाभार्थी।😂😂

-----------------

डिसेंबर महिन्यात पाऊस. आजपर्यंत कोणत्याही सरकारने केलं नाही
ते आज फक्त भाजप सरकारने केलं.
होय हे माझं सरकार,
मी लाभार्थी!

-----------------
कुणाच्या पावसाच्या कविता टाकायच्या राहिल्या असतील तर टाकून घ्या पटकन...

तो आलाय परत 🌨🌨🌨😉

-----------------
Meanwhile.....

आम्ही शाळेत असताना ही वादळं
कुठे मेलेली काय माहीत ????
😜😬😩😬😩

-----------------

गंभीर प्रश्न
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
सांताक्लॉज येणार आहे की गणपती
🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔

-----------------

मी काय म्हणतो

यंदा विधीमंडळाच्या अधिवेशनाला हिवाळी म्हणणार की पावसाळी... की हिवसाळी?

🤔🤔🤔🤔

-----------------

प्रिय पाऊस ...
.
.
.
.
.
.
.

परत एकदा
वांदे नको करूस..
काय ते एकदाच सांग..
स्वेटर घालू...की रेनकोट😁
😂😂😜😜😛😛😁😆😆😆🤣🤣

-----------------

आता नवीन ऋतु...

.
.
.
.
.
.
.

हिवसाळा..😀😀😀😀

-----------------

आमच्या नशिबी तावडेसारखा शिक्षणमंत्री सुद्धा नव्हता.

साला,
पडला पाऊस.... दे सुट्टी
सुटला वारा.... दे सुट्टी
😜😜😜😜

-----------------