मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने यंदा 20 फुटांपेक्षा जास्त उंचीचे थर लावण्यास नकार दिल्यानंतर यंदा जखमी गोविंदाच्या संख्येतही लक्षणीय घट झाली आहे. थरांची स्पर्धा कमी झाल्यामुळे यंदा गोविंदा जखमी होण्याचं प्रमाण घटलं, ही विशेष बाब आहे.


 

मुंबई संध्याकाळ पाच वाजेपर्यंत 49 गोविंदा जखमी झाले होते. त्यापैकी 40 जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आलं. तर नऊ जणांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

सायन रुग्णालयात 5, नायर रुग्णालयात 1, नानावटी रुग्णालयात 1, बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअरमध्ये 1 आणि भाभा रुग्णालयात 1 गोविंदावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतं.