ठाण्यात मनसेचा राडा, परप्रांतीय मच्छिमारांना मारहाण
एबीपी माझा वेब टीम | 24 Nov 2017 03:13 PM (IST)
ठाणे आणि कोलबाड परिसरातील स्थानिक कोळी समाज आहे, त्यांना या ठिकाणी मच्छी विकण्यास बसण्यासाठी जागा द्यावी, अशी मागणी मनसेची आहे.
ठाणे : ठाण्याच्या मनसेनं ‘खळ्ळ खटॅक’ केलं आहे. कोलबाड परिसरात परप्रांतीय मच्छी विक्रेत्यांना मारहाण करण्यात आली. इथे स्थायिक असणाऱ्या कोळी समाजाला आणि मराठी माणसालाच इथे मासे विक्रीचा हक्क आहे, असं सांगत मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. कोलबाड परिसरातील रस्त्यांवर अनेक मच्छी विक्रेते बसतात. एक रांगेत जवळपास 20 ते 25 मच्छी विक्रेते बसतात. यातील बहुतेक मच्छी विक्रेते हे परप्रांतीय आहेत, असा मनसे कार्यकर्त्यांचा आरोप आहे. ठाणे आणि कोलबाड परिसरातील स्थानिक कोळी समाज आहे, त्यांना या ठिकाणी मच्छी विकण्यास बसण्यासाठी जागा द्यावी, अशी मागणी मनसेची आहे. शिवीगाळ करत मारहाण करणारे मनसे कार्यकर्ते स्थानिक आहेत, मात्र त्यांची नावं अद्याप कळू शकलेली नाहीत. पाहा व्हिडीओ :