मुंबई : ऐन पावसाळ्यातही पाणीकपातीला सामोरं जाणाऱ्या मुंबईकरांना आनंदाची बातमी आहे. मुंबईतील पाणीकपात मागे घेण्याचा मनपा स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.


 

जुलै महिन्यात मुंबईच्या तलावक्षेत्रात सरासरीपेक्षा 33 टक्के जास्त पाऊस पडला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून 15 टक्के पाणीकपात सोसणाऱ्या मुंबईकरांना आता दिलासा मिळाला आहे.

 

पाणी कपातीबाबतचे सर्व निर्बंध उठवले असून, व्यावसायिक क्षेत्रातील 50 टक्के पाणी कपात मागे घेण्यात आली आहे.

 

गेल्या वर्षापासून म्हणजेच 2015 च्या 27 ऑगस्टपासून मुंबई पाणीकपात लागू करण्यात आली होती.