मुंबई : मुंबईकरांना गाय किंवा म्हशीचं ताज दूध मिळणं कठीण होण्याची शक्यता आहे. कारण महापालिका आणि सरकारने मुंबईतील सर्व तबेले शहरापासून 150 किलोमीटर दूर नेण्याची तयारी केली आहे.

 

सरकारच्या या निर्णयानंतर नाराज बॉम्बे मिल्क प्रोड्यूसर असोसिएशनने कोर्टात धाव घेतली. कोर्टाने सराकारच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली असली तरी तबेले कायमस्वरुपी मुंबईत राहतील याची शक्यता कमी आहे.

 

आता कोर्टाच्या निर्णयानंतर सरकार तबेल्यांच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयामध्ये काही बदल करणार का याकडे तबेले चालकांचं लक्ष लागलं आहे.