बिग बी आणि बॉक्सरची भेट
एबीपी माझा वेब टीम | 04 Jun 2016 10:28 AM (IST)
मुंबई : जगातील सर्वोत्तम बॉक्सिंगपटू मोहम्मद अली यांच्या निधनाची बातमी कळताच महानायक अमिताभ बच्चन भावूक झाले. त्यांनी आपल्या शोकसंदेशात अली यांचे आयुष्य प्रेरणादायी असल्याचा उल्लेख करून आपल्या लॉस एंजलिसमधील भेटीला उजाळा दिला. 1979 साली जमिन चित्रपटाच्या शुटींगसाठी अमिताभ बच्चन आणि त्यांची टीम लॉस एंजलिसला गेली होती. त्यावेळी त्यांची निर्माते प्रकाश मेहरा यांच्यासह अलींसोबत भेट झाली. हा फोटो गुगलवर उपलब्ध असून या फोटोत बिग बी अमिताभ बच्चन, त्यांचे बंधू अजिताभ बच्चन, प्रकाश मेहरा आहेत. हा फोटो काही महिन्यांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी रिट्विट केला होता.