ठाणे : पावसाळी वातावरणात तुम्ही ठाणे, पालघर किंवा रायगडातील धबधब्यांवर फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर तुमची निराशा होऊ शकते. ठाणे-पालघर-रायगड जिल्ह्यांतील धबधबे, तलाव आणि धरणांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.


ठाणे जिल्ह्यांतील धोकादायक पर्यटन स्थळांच्या एक किलोमीटर परिसरात जाण्यास मनाई घालण्यात आली आहे. येत्या 31 जुलैपर्यंत ही बंदी असणार आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
रत्नागिरीत पावसात धरण-धबधब्यांवर पर्यटकांना प्रवेशबंदी

पालघर जिल्ह्यातही धबधबे, धरणांवर पुढील दोन महिने पर्यटन बंदी असणार आहे. दोनच दिवसांपूर्वी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील धबधबे-धरणांसारख्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांना दोन महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

पर्यटनाचा आनंद घेण्याच्या नादात काही अतिउत्साही पर्यटकांनी आपला जीव गमावल्याच्या घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घातली जात आहे.