नवी मुंबई : गेले 9 दिवस चालेल्या बेस्टचा संपामुळे नवी मुंबई परिहवन सेवेला चांगलाच फायदा झालाय. बेस्ट संप काळात नवी मुंबई परिवहन उपक्रमाने मुंबईच्या 14 मार्गांवर फेऱ्या वाढविल्या आहेत यामुळे रोज सहा लाखांपर्यंत फायदा होत आहे.

नवी मुंबई परिवहन विभागाच्या 114 बसेस रोज साडेतीनशे फेऱ्या करतात. मात्र बेस्ट बंदच्या पार्श्वभूमीवर 40 जादा बसेस चालवण्यात आल्या. तर साडेतीनशे फेऱ्यांमध्ये 115 फेऱ्यांची वाढ केली आहे.

गेल्या आठ दिवसांच्या बंदच्या काळात परिवहन सेवेला या मार्गांवर रोज सहा लाखांचा फायदा झाला आहे. या बद्दलची माहिती नवी मुंबई परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे.

त्यामुळे आता बेस्टचं चुकतंय कुठं? हाच प्रश्न सर्व मुंबईकरांना पडला आहे. मुंबईसह इतर शहरांमधील सार्वजनिक बस वाहतूक सेवाही धोक्यात आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांमधल्या सार्वजनिक बस सेवा तग धरुन आहेत.

इतर शहरांमधल्या बसेस या महापालिका, खाजगीकरण, राज्य सरकारचे अनुदान यांच्या आधारावर उभ्या आहेत. परंतु बेस्टला उभं राहायला सध्या महापालिका किंवा राज्य सरकारचा कोणताच टेकू उपलब्ध नाही. त्यामुळे बेस्टची वाताहत होत आहे.

मुंबईतील बेस्टची स्थिती 

1. बेस्टच्या डोक्यावर सध्या अडीच हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे
2. बेस्टला महिन्याला सुमारे 200 कोटी रुपयांचा तोटा होतो.
3. दर महिन्याला कर्मचाऱ्यांचे पगार भागवण्यासाठी कर्ज काढावे लागते.
4. परिवहन विभागाचे एका दिवसाचे उत्पन्न 3 कोटी तर खर्च 6 कोटी रुपये इतका आहे.
5. 2018-19 या आर्थिक वर्षात 769 कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प,
6. बेस्टला वीजचोरी आणि वीजगळतीमुळे 200 कोटींचा तोटा होत आहे.
7. बेस्टला पर्याय असणाऱ्या मेट्रो, ओला-उबेरसारख्या जलदगती वाहतूक सुविधांमुळे बेस्टची प्रवासी संख्या घटली.

संबंधित बातम्या

बेस्टचा संप अखेर मागे, शशांक राव यांची घोषणा, कामगारांच्या पगारात 7 हजार रुपयांची वाढ

टीएमटी,केडीएमटी,पीएमटी सुरळीत, मग बेस्टचं काय चुकतंय?

बेस्ट संप : आठवडाभरात काय काय झालं?