मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे 'अॅक्सिडेंटल शिवसेनाप्रमुख' नव्हते असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने सिनेमात बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि निर्माते खासदार संजय राऊत यांनी सिनेमाचा प्रवास 'माझा' कट्ट्यावर सांगितला.


"बाळासाहेब ठाकरे हे अॅक्सिडेंटल शिवसेनाप्रमुख नव्हते, ते ओरिजनल होते. एखादी व्यक्ती बाळासाहेब सहज बनत नाहीत. नेते खूप बनतील, राष्ट्रपती बनतील, पंतप्रधान बनतील, मुख्यमंत्रीही बनतील पण कोणी बाळासाहेब ठाकरे बनत नाही. 1961 सालातील बाळ ठाकरे ही एक सामान्य व्यक्ती बाळासाहेब ठाकरे कशी बनली यावर हा सिनेमा आहे", असे राऊत म्हणाले.

"हा सिनेमा करताना त्यामध्ये बाळासाहेबांची नक्कल करायची नाही असे सुरवातीलाच ठरवले होते. बाळासाहेबांचं आयुष्य, त्यांचा संघर्ष लोकांसमोर मांडायचा होता. एखाद्या हॉलीवुड किंवा बॉलीवुड सिनेमाला पडद्यावर जो 'मसाला' लागतो तो सगळा बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यात होता. त्यामुळे सिनेमात वेगळं काही समाविष्ट करण्याची गरज पडली नाही", असेही संजय राऊत यांनी सांगितले.

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि संजय राऊत 'माझा' कट्ट्यावर