तर गडकरी गटाचे राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार पहिल्या सत्रात गैरहजर होते. दुसऱ्या सत्रात राजकीय ठराव मांडण्यासाठी मुनगंटीवार सहभागी होणार आहेत. मंत्री पंकजा मुंडेही आजच्या बैठकीला अनुपस्थित आहेत. वैयक्तिक कारणांसाठी परदेशात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पंकजा यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेत असून त्या गैरहजर आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रीय कार्याध्यक्षांच्या उपस्थितीत राज्यातील ही शेवटची कार्यसमितीची बैठक आहे. यामुळे सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती अपेक्षित होती. मात्र या नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे एक गट नाराज असल्याची कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू आहे.
चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण
गडकरीजी, सुधीरभाऊ, पंकजाताई अनुपस्थित असल्याची बातमी सुरु आहे. सुधीरभाऊंची तब्येत ठीक नसल्याने ते उशिरा आले आहेत. इतरांनी अनुपस्थितीबाबत पूर्व कल्पना दिली होती. आता सुधीरभाऊ राजकीय प्रस्ताव मांडायला दुसऱ्या सत्रात आले आहेत. त्यामुळे ते सुद्धा दाखवावं अशी विनंती आहे, असं पाटील म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची राज्यभर महाजनादेश यात्रा, विधानसभेसाठी असा आहे भाजपचा रोडमॅप
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार कार्यक्रम आखला आहे. विधानसभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. एक ऑगस्ट ते 31 ऑगस्ट अशी महिनाभर मुख्यमंत्र्यांची राज्यभर महाजनादेश यात्रा निघणार आहे. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही महाजनादेश यात्रा काढणार काढणार आहेत. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात राज्यभर भाजपची महाजनादेश यात्रा निघणार आहे.
आगामी विधानसभेसाठी महाराष्ट्रात भाजप- शिवसेना युती होणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. विधानसभेच्या तयारीसाठी शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रा सुरु केली आहे. यानंतर आता भाजप देखील विधानसभेच्या तयारीसाठी जोमाने मैदानात उरतण्याच्या तयारीत असेल.
काय आहे भाजपचा विधानसभा निवडणुकीसाठीचा रोडमॅप?
21 जुलै 2019 - प्रदेश विस्तारित कार्यसमिती
25 जुलै ते 10 आॅगस्ट 2019 - जिल्हासह शक्ती केंद्र प्रमुख बैठक
9 आॅगस्ट 2019 - सदस्यता अभियान ड्राइव्ह
1 जुलै ते 15 आॅगस्ट - नवमतदार नोंदणी अभियान (युवा मोर्चा)
15 जुलै ते 15 आॅगस्ट - विस्तारक योजना (सर्व शक्ती केंद्रांपर्यंत)
10 आॅगस्ट ते 25 आॅगस्ट - विधानसभाश: बूथ कार्यकर्ता संमेलन
1 आॅगस्ट ते 12 आॅगस्ट - शक्ती सन्मान महोत्सव (रक्षाबंधन पर्व) (बुथस्तरावर व मंडल स्तरावर राखी संकलन)
16 आॅगस्ट - रक्षाबंधन कार्यक्रम
1 आॅगस्ट ते 31 आॅगस्ट - महाजनादेश यात्रा
15 आॅगस्ट ते 1 सप्टेंबर - विधानसभा स्तरावर नवमतदार संवाद कार्यक्रम
निर्वाचित सदस्य संमेलन
16 आॅगस्ट - स्व. अटलजी स्मृतीदिन (शक्ती केंद्रस्थानी बूथ कार्यकर्ता एकत्रीकरण)
तसंच गणेशोत्सवात सरकारच्या लोककल्याणकारी योजनांवर आधारित सजावट
तसेच विविध प्रकारच्या स्पर्धा - गणेशोत्सव मंडळ तसंच घरगुती गणपतींसाठी