मुंबई : नारायण राणे यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ स्थापन केल्यानंतर, आता कार्यकर्त्यांची जमवाजमव करुन पक्षबांधणी सुरु झाली. मात्र या पक्षात एक चिमुकल्या कार्यकर्त्याने प्रवेश केला आहे. तो चिमुकला म्हणजे आमदार नितेश राणेंचा मुलगा होय.
आमदार नितेश राणे यांच्या मुलाने त्याच्या आजोबांच्या म्हणजेच नारायण राणे यांच्या ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा’त प्रवेश केला आहे. नितेश राणे यांनी ट्विटरवर फोटो पोस्ट करुन यासंदर्भात माहिती दिली.
“माझ्या मुलाने माझ्याआधी त्याच्या आजोबांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला आहे. मी अजूनही प्रतीक्षेतच आहे. जय स्वाभिमान!!”, असे नितेश राणे यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
नितेश राणे यांनी अद्याप राणेंच्या नव्या पक्षात म्हणजेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केलेला नाही. ते काँग्रेसचे कणकवलीतून विद्यमान आमदार आहेत. ते नव्या पक्षात कधी प्रवेश करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दरम्यान, काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर राणेंनी आपला नवा पक्ष (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष) स्थापन केला. आज पक्षाच्या नावाची घोषणा केली. पक्षाचा झेंडा अद्याप प्रसिद्ध करण्यात आला नाही.
मुलगा आजोबांच्या पक्षात, मी वेटिंगवरच : नितेश राणे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Oct 2017 10:55 PM (IST)
आमदार नितेश राणे यांच्या मुलाने त्याच्या आजोबांच्या म्हणजेच नारायण राणे यांच्या ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा’त प्रवेश केला आहे. नितेश राणे यांनी ट्विटरवर फोटो पोस्ट करुन यासंदर्भात माहिती दिली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -