Nitesh Rane Letter To DCM Devendra Fadnavis : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी बिल्डरांकडून जनतेला वेठीस धरण्यावरुन आदित्य ठाकरे (Shiv Sena Aaditya Thackeray) आणि शिवसेनेवर टीका केली आहे. यासंदर्भात नितेश राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र लिहिलं आहे. यात 'आदित्यसेनेला' टक्केवारी मिळवून देणाऱ्या बिल्डरांवर कडक कारवाई करा, असं म्हटलं आहे.
नितेश राणे यांनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, मनपाच्या निवडणूका जवळ आल्या आहेत आणि परत सत्ताधारी आदित्यसेनेनं मुंबई महाष्ट्रापासून तोडणार आणि मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करणार अशा उलटा बोंबा मारणं सुरू केले आहे. परंतु वास्तविक यांच्या जवळच्याच असलेल्या टक्केवारी मिळवून देणाऱ्या विकासकामुळे मुंबईकर नाईलाजास्तव मुंबईतून हद्दपार झाला आहे.
राणे यांनी पत्रात म्हटलं आहे की, पुर्नविकास नियंत्रण नियमावली अंतर्गत भाडेकरू तथा एसआरएमधील झोपडपट्टी धारक खासगी विकासकांची नेमणुक करतात. या पद्धतीच्या अनेक पुर्नविकास प्रकल्पांमध्ये विकासक एक ते दिड वर्षांचे पर्यायी जागेचे भाडे देणे कबूल करतात.परंतु अनेक गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये अनेक विकासकांची कामे रखडल्याने त्यांनी भाडेही देणे बंद केले आहे, असं राणे यांनी म्हटलं आहे.
नाईलाजास्तव मराठी कुटुंब आपले हक्काचे घर कमी किमतीत विकावं लागतंय
राणेंनी पत्रात म्हटलं आहे की, एका बाजूला कोविडमुळे मराठी बांधवांची रोजीरोटी केली आणि दुसऱ्याबाजूला मुंबईतील मराठी माणसाला आपल्या आयुष्यातील सहा सहा तास वसई विरारच्या प्रवासात घालवावे लागतात. आहे ते घर विकासकाने अडवून ठेवलंय आणि भाडे मिळण्याअभावी घरातून हकालपट्टी होतेये. काही ठिकाणी तर इमारत तयार असूनही ना इमारत ताब्यात मिळतेय ना हक्काचे भाडेही मिळतेय. त्यामुळे नाईलाजास्तव मराठी कुटुंब आपले हक्काचे घर विकासकला किंवा एजंटला स्वत: दरात विकण्यास बाध्य होतात, असा आरोप राणे यांनी केला आहे.
अशा प्रकरणांमध्ये सरकारच्यावतीने ठोस पाऊल उचलून जनतेला वेठीस धरणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणात आपण लक्ष घालून सर्व सामान्य मराठी माणसाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती राणे यांनी फडणवीसांना केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या