मुंबई : ‘कमला मिल कंपाऊंडमधील रेस्टॉरंटला लागलेल्या आगीला ठाकरे कुटुंबीय जबाबदार आहेत.’ असा आरोप करत काँग्रेसचे आमदार आणि नारायण राणेंचे पुत्र नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
‘या आगीमध्ये शिवसेनेच्या नेत्याचा एखादा नातेवाईक दगावला असता तर ठेवले असते का असे रेस्टॉरंट मुंबईमध्ये?’ असं म्हणत नितेश राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. ‘या इमारतीतील हॉटेल अनधिकृतपणे सुरु होतं. तेव्हा यांना परवानगी दिली कुणी?’ असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
‘या घटनेला जबाबदार कोण आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे... जोपर्यंत तुमच्या आडनावाला ठाकरे लागलेलं नाही तोपर्यंत, मुंबईकरांच्या आयुष्याला काहीही किंमत नाही. या आगीमध्ये शिवसेनेच्या नेत्याचा एखादा नातेवाईक दगावला असता तर ठेवले असते का असे रेस्टॉरंट मुंबईमध्ये? म्हणजे यामध्ये तुमच्या आडनावावर तुमचं आयुष्य वाचवलं जातं, ठाकरे आडनावामुळे महाबळेश्वर आणि लोणावळामधील हॉटेलवर कारवाई केली जाते. पण कमला मिलमधील या रेस्टॉरंटला दोन ते तीन महिन्याआधीच नोटीस देण्यात आली. पण तरीही ते सुरुच होतं. या हॉटेलकडे फक्त खाण्याचं लायसन्स होतं. मग याला कुणी हुक्का चालू करण्याची परवानगी दिली?’
काय आहे प्रकरण?
हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबला गुरुवारी रात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने, तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचं मोठं नुकसान झालं आहे.
संबंधित बातम्या :
मुंबईतील लोंढे आवरा: हेमा मालिनी
‘मी परवाच इथे आलो होतो, तेव्हाच आगीची भीती व्यक्त केली होती’
हॉटेल मालकांवर कारवाई होणारच, अधिकाऱ्यांवरही करु: मुख्यमंत्री
कमला मिल आग: 5 अधिकारी निलंबित
1Aboveचं अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश, मात्र कारवाई नाहीच : खान
मुंबईवर दु:खाचा डोंगर, राहुल गांधींकडून मराठीतून फुंकर
भेंडीबाजारातील त्या इमारतीचं काय? : विखे पाटील
कमला मिल्स आग: टॉयलेटमधून फोन केला, भावोजी आम्हाला वाचवा!
कमला मिल्स आग : आत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या भावांचा मृत्यू
कमला मिल्स आग : सुमारे 200 जणांचा जीव वाचवणारे 'रक्षक'
कमला मिल्स आग : वाढदिवशीच खुशबूला मृत्यूने गाठलं!
कमला मिल्स आग : मनसे नेत्याच्या तक्रारीकडे वेळीच लक्ष दिले असते तर...
कमला मिल्स आग : ...आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली
मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यू
मुंबई अग्नितांडव : आगीची भीषणता सांगणारे फोटो आणि व्हिडीओ
मुंबईतील अग्नितांडवाला ठाकरे कुटंबीय जबाबदार : नितेश राणे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Dec 2017 07:42 PM (IST)
‘कमला मिल कंपाऊंडमधील रेस्टॉरंटला लागलेल्या आगीला ठाकरे कुटुंबीय जबाबदार आहेत.’ असा आरोप करत काँग्रेसचे आमदार आणि नारायण राणेंचे पुत्र नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -