मुंबई : एकीकडे काँग्रेस नेते नारायण राणे हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवर आगपाखड करत असताना दुसरीकडे राणेंचे चिरंजीव आणि काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.


‘मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटलांच्या मुलाची शिर्डी संस्थानावर वर्णी लागते. असं असेल तर कोणत्या तोंडानं सरकारला विरोध करणार?; असा थेट हल्लाबोल नितेश राणेंनी केला आहे.

‘इतकंच नव्हे तर विधिमंडळात देखील तसंच आहे. विधानसभेत देखील यांचं फिक्सिंग असतं.’ असा गंभीर आरोप नितेश राणेंनी राधाकृष्ण विखेंवर केला आहे.

राणेंच्या ऐतिहासिक घोषणेला घटस्थापनेचा मुहूर्त!

दुसरीकडे, 21 सप्टेंबरला म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी भविष्यातली दिशा स्पष्ट करणार असल्याची घोषणा नारायण राणेंनी काल (सोमवार) सिंधुदुर्गात केली. यावेळी राणेंनी पक्षातली आपली नाराजी जाहीर करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यावर चौफेर टीका केली.

“नारायण राणे त्यांना कळला नाही. म्हणून त्यांनी असा निर्णय घेतला. त्यांना माहित नाही, राणेंना डिवचलं की त्यांना दुप्पट ताकद येते. बऱ्याच जणांनी प्रयत्न केले. मात्र मी तिथेच आहे. डिवचणारे मात्र दिसत नाहीत.”, असे म्हणत राणेंनी काँग्रेसवर निशाणा साधला.

संबंधित बातम्या :

...तोपर्यंत दाढी काढणार नाही : निलेश राणे

राणेंच्या ऐतिहासिक घोषणेला घटस्थापनेचा मुहूर्त!

राणेंचे कुरघोडीचे सर्व आरोप काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी फेटाळले

दसऱ्याआधी सीमोल्लंघन करणार : नारायण राणे