मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारीची ऑफर भाजपकडून देण्यात आली आहे. पण स्वत: राणे दिल्लीत जाण्यास इच्छुक नसल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. त्याच पार्श्वभूमीवर राणेंचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी आपला व्हॉट्सअॅप डीपीही बदलला आहे.

याचबाबत नितेश राणे यांनी एक ट्वीट करुन राणेंनी महाराष्ट्रातच थांबावं असं म्हटलं होतं. आता यासोबतच नितेश राणे यांनी आपला व्हॉट्सअॅप डीपी देखील बदलला आहे.



'साहेब महाराष्ट्राला तुमची गरज आहे' अशा आशयाचा व्हॉट्सअॅप डीपी नितेश राणे यांनी ठेवला आहे. त्यामुळे भाजपकडून देण्यात आलेली ऑफर स्वीकारण्यात नारायण राणेंना फारसा रस नसल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

नितेश राणे यांचं ट्विट

दरम्यान, नारायण राणेंना भाजपने दिलेल्या ऑफरनंतर नितेश राणे यांनी ट्विट केलं.


“महाराष्ट्राच्या राजकारणात राणेसाहेबांची गरज आहे. अजून बराच काळ ते महाराष्ट्रातच रहावेत अशी आमच्यासारख्या हितचिंतकांची इच्छा आहे. आम्ही त्यांना विधानसभेत पाहू इच्छितो, राज्यसभेत नाही. आशा आहे ते समजून घेतील”, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

मला भाजपकडून राज्यसभेची ऑफर: नारायण राणे

मला मंत्रिपद देण्याबाबत विलंब का होतोय, याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना विचारा. मला त्याबाबत माहिती नाही. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याशी दिल्लीत चर्चा झाली. मला भाजपकडून राज्यसभेची ऑफर आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दिली. ते एबीपी माझाशी बोलत होते.

संबंधित बातम्या :

शिवसेनेच्या भीतीने राणेंना राज्यसभेची ऑफर : रामदास आठवले

नारायण राणेंना भाजपची ऑफर अमान्य?

मला भाजपकडून राज्यसभेची ऑफर: नारायण राणे

नारायण राणे भाजपची खासदारकीची ऑफर मान्य करतील?

दिल्लीत राणे-फडणवीस एकत्र, मंत्रिपदावर निर्णयाची शक्यता

दिल्लीत अमित शाह, मुख्यमंत्री आणि राणेंची बैठक, मंत्रिपदावर खलबतं?