Antilia Case : मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारी रोजी स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ गाडी उभी करण्यात आल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यानंतर मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी आपला गुजरातचा नियोजीत दौरा रद्द केला होता. अंबानी यांच्या निवासस्थाच्या सुरक्षा प्रमुखांनी ही माहिती एनआयएला दिली. 


धक्कादायक! 'अँटिलिया' प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी परमबीर सिहांनी सायबर एक्सपर्टला दिली लाच!


सुरक्षा प्रमुखांनी दिलेल्या आपल्या जबाबात म्हटले की, स्फोटकांनी भरलेली गाडी आणि धमकीचे पत्र मिळाल्यानंतर मी लगेच याची माहिती मुकेश अंबानी यांना दिली. त्याचदिवशी नीता अंबानी जामनगरला जाणार होत्या. त्यांचा दौरा पूर्वनियोजित होता. परंतु पोलिस उपायुक्तांच्या सल्ल्यानंतर त्यांनी हा दौरा केला. 


Mansukh Murder Case : मनसुख हिरण प्रकरणात NIA ने पोलीस निरीक्षक सुनील मानेंना केली अटक


या अगोदर देखील अनेकवेळा मुकेश अंबानी यांना धमकी देण्यात आल्या होत्या. परंतु त्या धमकी ऑक्टोबर 2020 ला सुरू झालेल्या किसान मोर्चा संदर्भातील होत्या, असे आपल्या जबाबात म्हटले आहे. तसेच मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारी रोजी स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ गाडी आणि धमकीचे पत्र मिळाल्यानंतर कोणावरही शंका नाही, असेही सुरक्षाप्रमुख म्हणाले.


'इको' कारमुळे अँटिलिया स्फोटकं प्रकरण उलगडणार? आतापर्यंत 8 गाड्या जप्त


माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. तपास यंत्रणानुसार  ठाण्यातीस व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येत देखील वाझे सहभागी होते. मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर सापडलेली एसयूवी ही हिरेन यांची असून ती चोरी झाली होती. पाच मार्चला ठाण्यात एका खाडीजवळ हिरेन यांचा मृतदेह सापडला होता.  


काय आहे स्कॉर्पिओच्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये 


स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ कार सापडल्यानंतर तपास करणाऱ्या फॉरेंसिक टीमच्या निदर्शनास काही गोष्टी आल्या आहेत. या कारसोबत कुठल्याही प्रकारची छेडछाड तसेच नुकसान करण्याचा प्रयत्न झाला नसल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे मनसुख हिरण यांची ही स्कॉर्पिओ कार 17 फेब्रुवारी रोजी इस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या सर्व्हिस रोडवरुन चोरी झाली होती. ज्याची तक्रार हिरण यांनी विक्रोळी पोलिसात केली होती.  फॉरेंसिक रिपोर्टनुसार, हायवेवरुन ज्यावेळी ही कार चोरी झाली त्यावेळी त्या कारचा दरवाजा खोलण्यासाठी किंवा चोरी करण्यासाठी कुठलीही छेडछाड, तोडफोड केलेली नाही. तसेच कुठलेही निशाण मिळालेले नाहीत. याचा अर्थ असा की कार चोरी करणाऱ्या व्यक्तिनं अगदी सहजपणे ही कार त्या ठिकाणाहून चोरी केली होती.