मुंबई : बेस्ट प्रशासन संपादरम्यान कामावर नसलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार कापणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. विविध मागण्यांसाठी बेस्ट कामगारांनी संप पुकारला होता. हा संप 7 जानेवारी ते 15 जानेवारीदरम्यान 9 दिवस सुरु राहिला. संपकरी बेस्ट कामगारांचा संप काळातील 9 दिवसांचा पगार कापला जाणार आहे.


संपकरी बेस्ट कामगारांचा 9 दिवसांचा पगार कापला जाणार असल्याच्या माहितीला बेस्ट समितीकडूनही दुजोरा मिळाला आहे. त्यामुळे बेस्ट कामगारांच्या पगारातून 9 दिवसांचा पगार वजा केला जाणार असून कामावर हजर असलेल्या दिवसांचाच पगार कामगारांना मिळणार आहे.

बेस्ट संप मागे घेताना संपकरी कामगारांवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचे आश्वासन कामगार संघटनेला देण्यात आले होते. परंतु हे आश्वासन पाळले जाणार नसल्याची चर्चा सुरु आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आढावा

7 जानेवारी : मध्य रात्रीपासून संप सुरू झाला

8 जानेवारी : पालिका आयुक्त आणि युनियन नेते यांच्यात बैठक झाली, तोडगा नाही

8 जानेवारी : संध्याकाळी पुन्हा आयुक्त आणि शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेत बैठक झाली यावेळी सेनेच्या युनियनने संपातून माघार घेतली

9 जानेवारी : बेस्ट महाव्यवस्थापक आणि बेस्ट कामगार कृती समिती यांच्यात दोन बैठका झाल्या तोडगा नाही

10 जानेवारी : बेस्ट महाव्यवस्थापक आणि बेस्ट कामगार कृती समितीत पाच तास बैठक झाली.

10 जानेवारी : संध्याकाळी महापौर बंगल्यावर उद्धव ठाकरे, महापालिका आयुक्त, बेस्ट महाव्यवस्थापक, बेस्ट कामगार संघटना यांच्यात 7 तास बैठक झाली. चर्चा निष्फळ

11 जानेवारी : न्यायालयाने संपावर तोडगा काढण्यासाठी त्रिसदस्यियसमिती तयार करुन चर्चा करुन तोडगा काढण्यास सांगितले.

12 जानेवारी : मंत्रालयात राज्य सरकारच्या त्रिसदस्यीय समितीच्या बेस्ट कामगार कृती समिती सोबत बैठक झाली.

13 जानेवारी : संपाबाबत कोणतीच चर्चा नाही, तोडगा नाही

14 जानेवारी : बेस्ट संपाबाबत मंत्रालयात पुन्हा एकदा त्रिसदस्यीय उच्च समिती आणि बेस्ट कामगार कृती समितीत बैठक झाली.

14 जानेवारी : मनसेने संप प्रश्नात उडी मारली, शिवसेना बेस्टपेक्षा कोस्टल रोडला प्राधान्य देते म्हणून, मुंबईतले कोस्टल रोडचे काम बंद पाडले. मनसे कार्यकर्त्यांनी मेट्रो 3 चे काम थांबवले

14 जानेवारी : न्यायालयासमोर त्रिसदसदस्यीय समिती गेली. कोर्टाने बेस्ट संघटनांना संप मागे घेण्यास सांगितले. बेस्ट संघटनांना फटकारले, मात्र उद्या पुन्हा सुनावणी होणार. बेस्ट संप अद्याप सुरु आहे.

संबंधित बातम्या

'या' निकषांवर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे

बेस्टचा संप अखेर मागे, शशांक राव यांची घोषणा, कामगारांच्या पगारात 7 हजार रुपयांची वाढ

टीएमटी,केडीएमटी,पीएमटी सुरळीत, मग बेस्टचं काय चुकतंय?

बेस्ट संप : आठवडाभरात काय काय झालं?

बेस्ट संप : जनतेला वेठीस धरणं चुकीचं, हायकोर्टाने खडसावलं

बेस्ट संपात मनसेची उडी, कोस्टल रोड आणि मेट्रो 3 विरोधात आंदोलन

बेस्टला वाली कोण? महापालिका, सरकार जबाबदारी घेईना!

बेस्ट कामगारांना सात नाही तर साडेतीन हजार वेतनवाढ : अनिल परब