BMC on Coronavirus new Variant in Mumbai : आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने जगभरात खळबळ उडाली आहे. जगातील अनेक देश सतर्क झाले असून कोरोनाच्या या नव्या वेरियंटचा संसर्ग होऊ नये यासाठी पावले उचलली जात आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारही सतर्क झाले असून विषाणूच्या या नव्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नव्या स्ट्रेनबाबत चर्चा आणि पुढील नियोजन कण्यासाठी आज मुंबई महापालिका प्रशासनाची महत्वाची बैठक पार पडणार आहे. 


नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरता काही महत्वाची पावलं उचलण्याबाबत चर्चा होणार आहे.  परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर मुंबई महापालिका प्रशासनाकडून बारीक नजर ठेवली जाण्यावर भर दिला जाणार आहे.  आज संध्याकाळी 5.30 वाजता ऑनलाईन पद्धतीनं महापालिका आयुक्तही बैठक घेणार आहे. या बैठकील सर्व कोविड हॉस्पिटलचे डीन, टास्क फोर्स सदस्य, अतिरीक्त आयुक्त, वॉर्ड ऑफिसर,  आरोग्य अधिकारी उपस्थित राहणार आहे. 



दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवा व्हेरिएंट आढळला आहे.  त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा विचार मुंबई महापालिकेने केला आहे.  नव्या स्ट्रेनबाबत चर्चा आणि पुढील नियोजन करण्यासाठी आज मुंबई महापालिका प्रशासनाची महत्वाची बैठक होत आहे. 


कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने जगभरात खळबळ; राज्य सरकार उचणार 'ही' पावले


दक्षिण आफ्रिकेत आलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरियंट मुळे विमानसेवा बंद करण्याची कोणतीही मागणी नाही असं स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने दिलं आहे.   परदेशामधून येणाऱ्या प्रवशांच्या जिनोम सिक्वेसींग टेस्ट करण्यावर पालिका भर देणार आहे.   आगामी नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून अनेक नागरिक भारतात येण्याची शक्यता आहे.


युरोपीय देशांमध्ये करोनाचा उद्रेक वाढत आहे. त्यामुळे तेथून येणारे प्रवासी बाधित असल्याचे आढळल्यास, त्यांच्या जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्या (जिनोम सिक्वेन्सिंग) करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. तसेच या देशांमधील जिनोम सिक्वेन्सिंग अहवालही देण्याची मागणी करोना टास्क फोर्सकडे केली आहे.



सध्या रशिया, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, जर्मनी या देशांमध्ये पुन्हा एकदा करोनाचा फैलाव वेगाने होत आहे. या देशांमध्ये करोनाचे नवा व्हेरीएंट आढळल्यास  त्यावर देखरेख ठेवणे गरजेचे आहे.



मुंबई महापालिकेने नेमकी काय तयारी केली? 
 
कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटमुळे मुंबईची चिंता वाढली आहे. 


नव्या स्ट्रेनबाबत चर्चा आणि पुढील नियोजन कण्यासाठी आज मुंबई महापालिका प्रशासनाची महत्वाची बैठक बोलावली आहे


नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरता काही महत्वाची पावलं उचलण्याबाबत चर्चा होणार आहे


परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर मुंबई महापालिका प्रशासनाकडून बारीक नजर ठेवली जाण्यावर भर असेल. 


आज संध्याकाळी ५.३० वाजता ऑनलाईन पद्धतीनं महापालिका आयुक्त ही बैठक घेतील...


या बैठकील सर्व कोविड हॉस्पिटलचे डिन,टास्क फोर्स सदस्य, अतिरीक्त आयुक्त, वॉर्ड ऑफिसर,  आरोग्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत