ठाणे : मुंबईकर लोकल प्रवाशांचा प्रवास लवकरच अधिक फास्ट होणार आहे. कारण, ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान फास्ट लोकलसाठी स्वतंत्र ट्रॅक टाकण्याचं काम मध्य रेल्वेने हाती घेतलंय. यामुळे फास्ट लोकलला आता एक्स्प्रेस गाड्यांसाठी थांबावं लागणार नाही.
ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान आत्तापर्यंत फास्ट लोकल्स आणि एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक एकाच ट्रॅकवरून होत होती. त्यामुळे एक्स्प्रेसच्या वेळापत्रकानुसार लोकल्सचं वेळापत्रक अॅडजस्ट करावं लागत होतं.
काही वेळा यामुळे लोकलसेवेला फटकाही बसत होता. मात्र आता ठाणे ते दिवा दरम्यान अस्तित्वात असलेल्या चार ट्रॅकसोबत दोन अतिरिक्त रेल्वे ट्रॅक टाकण्यात येत आहेत. यासाठी मध्य रेल्वेने आज कळवा आणि मुंब्रा स्थानकांवर 10 तासांचा विशेष मेगाब्लॉक घेतलाय.
या नव्या ट्रॅकमुळे लोकल्सची वाहतूक संपूर्णपणे स्वतंत्र होणार असून एक्स्प्रेस गाड्यांमुळे लोकल्सना होणारा विलंब टळू शकणार आहे. मध्य रेल्वेवर फक्त ठाणे ते दिवा दरम्यान फास्ट लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या एकाच ट्रॅकवर धावत असून कल्याण ते दिवा आणि ठाणे ते कुर्ल्यापर्यंत एक्स्प्रेस गाड्यांचा स्वतंत्र ट्रॅक अस्तित्वात आहे.
एक्स्प्रेससाठी थांबण्याची आता गरज नाही, मध्य रेल्वेवर लोकल सुसाट धावणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Sep 2018 11:43 AM (IST)
ठाणे ते दिवा दरम्यान अस्तित्वात असलेल्या चार ट्रॅकसोबत दोन अतिरिक्त रेल्वे ट्रॅक टाकण्यात येत आहेत. यासाठी मध्य रेल्वेने आज कळवा आणि मुंब्रा स्थानकांवर 10 तासांचा विशेष मेगाब्लॉक घेतलाय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -