एकूण आरक्षण 103 टक्के
एससी, एसटी, एनटी, इ. : 52 टक्के
मराठा : 16 टक्के
खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल : 10 टक्के
इनहाऊस : 20 टक्के
व्यवस्थापन (मॅनेजमेंट) : 5 टक्के
यामध्ये शाळांना संलग्नित असलेल्या कनिष्ठ महविद्यालयाला तसंच अल्पसंख्याक महाविद्यालय नसलेल्या महविद्यालयासमोर हा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया नेहमी कशी आणि कोणत्या निकषांवर राबवली जाणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
अल्पसंख्याक महाविद्यालयात अल्पसंख्याक 50 टक्के, व्यवस्थापन 5 टक्के आणि इनहाऊस 20 टक्के कोटा देण्यात आला आहे. तर संवैधानिक आरक्षण या महाविद्यालयात देण्यात येत नाही. यामुळे काही प्रमाणात अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळत आहे. मात्र बिगर अल्पसंख्याक महाविद्यालयं आणि शाळांना संलग्नित असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयासाठी खुल्या प्रवर्गाला प्रवेश कसा देणार हा प्रश्न आहे.
मराठा आणि खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकल्यास यंदा महाविद्यालयातील प्रवेशाची वाट अधिकच बिकट होईल. त्यामुळे ऑनलाईन प्रवेशात बदलांसाठी वेळ द्यावा लागणार आहे. या प्रवेशासंदर्भात तोडगा काढण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठका सुरु असल्याची माहिती आहे.