मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारला जनतेचा कळवळा आला आहे. कारण उद्या म्हणजे 8 मार्च रोजी मंत्रिमंडळाची बैठक होणार असून यात तब्बल 50 निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या आठवड्यातील ही दुसरी आणि आचारसंहितेआधीची शेवटची मंत्रिमंडळाची बैठक असेल.


5 मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 22 निर्णय घेण्यात आले होते. आता दोन दिवसातच पुन्हा 8 मार्चला मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. एकाच आठवड्यातील ही दुसरी मंत्रिमंडळ बैठक असेल.

राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू, 20 ते 22 टक्के पगारवाढ मिळणार


सरकारकडून सर्व विभागाच्या सचिवांना जनहिताचे आणि लोकप्रिय अशा प्रलंबित निर्णयांची यादी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीआधी या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. अनेक सत्ताधारी खासदार आणि आमदारांच्या मतदारसंघात मतांवर परिणाम करणारे निर्णय घेण्याचा दबाव सरकारवर दबाव आहे.

त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध वर्गाला खुश करण्यासाठी घोषणांचा पाऊस होण्याची शक्यता आहे.