महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंच्या अधिकारांवर गदा!
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 21 Sep 2016 05:32 PM (IST)
नवी मुंबईः नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात पुन्हा एकदा सर्वपक्षीय एकवटले आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या उद्घाटनाचे अधिकार फक्त महापौरांनाच देण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात नवी मुंबईमध्ये तुकाराम मुंढेंनी धाडसी निर्णय घेतले. त्यामुळे लोकप्रतिनिधी नाराज आहेत. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे आणि तुकाराम मुंढेंमध्येही संघर्ष झाला तर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईकांनाही घणसोली बस डेपोच्या उद्घटनाला परवानगी दिली नाही. त्यामुळे आता सर्वपक्षीयांकडून तुकाराम मुढेंची कोंडी करण्याचे प्रयत्न केले आहेत. यापूर्वी अनधिकृत बांधकाम प्रकरणावरुन मंदा म्हात्रे आणि तुकाराम मुंढे यांचा वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचला होता.