मुंबई : नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NERDCO), महाराष्ट्र यांच्या पुढाकारानं मुंबईत भारतातला सर्वात मोठा रिअल इस्टेट प्रॉपर्टी एक्सपो भरवला जातोय. 'होमथॉन प्रॉपर्टी एक्सपो 2023'च्या (Homethonn) दुसऱ्या आवृत्तीचं आयोजन 24 ते 26 नोव्हेंबर 2023 या कालावधीत बीकेसीमध्ये होत आहे. यंदाच्या होमथॉन एक्स्पोमध्ये एमएमआरमधील आघाडीच्या विकासकांकडून 500 हून अधिक गृह प्रकल्पांचं प्रदर्शन करण्यात येणार आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण, नवी मुंबई, पनवेल, रायगड, मीरा रोड, वसई, विरार यांसह यंदा पुणे, नाशिक आणि नागपूर येथील गृह प्रकल्प आणि भूखंड योजनांचाही यंदा समावेश प्रदर्शनात आहे.
20 लाख रूपयांपासून 15 कोटींपर्यंतचे पर्याय गृह खरेदीदारांकरता उपलब्ध असतील. तसेच खरेदीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी, बरेचसे विकासक त्यांच्या बाजूनं कोणतंही मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क, जीएसटी, प्रक्रिया शुल्कात सवलत, तसेच स्पॉट बेनिफिट म्हणजेच तत्काळ लाभ आणि इतर उत्सवी ऑफर लाभांसारखे फायदेही उपलब्ध आहेत.
दिवाळीच्या दरम्यान घर खरेदीला सर्वाधिक पसंती असते, त्यामुळे घरांची मागणीही वाढलेली दिलते. या एक्स्पोमुळे घर विक्रीलाही चालना मिळते. नरेडको महाराष्ट्रात विश्वास, पारदर्शकता आणि नावीन्यपूर्ण परिसंस्था वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे. ज्यामुळे घर खरेदीदारांच्या भावनांमध्येही लक्षणीय सुधारणा झाली आहे. होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो 2023 हे विकासकांसाठीही विशेष सवलतीच्या दरात घर खरेदीदारांना त्यांचे प्रीमियम प्रकल्प प्रदर्शित करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळवून देत. विकासक, गृहखरेदीदार आणि वित्त संस्थांनाही एकाच छताखाली आणल्यानं घर खरेदी प्रक्रिया सुरळीत होते.
यंदाच्य एक्सपोत विकासकांमध्ये हिरानंदानी ग्रुप, गोदरेज प्रॉपर्टीज, के रहेजा कॉर्प, पिरामल रियल्टी, एल अँड टी रियल्टी, बिर्ला रिअल इस्टेट, शापूरजी पालोनजी, अदानी, रुणवाल ग्रुप, टाटा हाउसिंग, प्रेसकॉन, रौनक ग्रुप, द वाधवा ग्रुप, चांडक ग्रुप, एकता वर्ल्ड, कनाकिया, आर्केड, डायनामिक्स, ट्रान्सकॉनसह इतर अनेकांचा समावेश आहे. तसेच आयसीआयसीआय, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स यासारख्या गृहनिर्माण वित्त कंपन्याही या एक्सोपत खरेदीदारांना गृहकर्ज सुलभ करण्यासाठी मदत करणार आहेत.
ही बातमी वाचा: