Neral-Matheran Train : मध्य रेल्वे प्रवाशांच्या हितासाठी माथेरान टॉय ट्रेनला विशेष वातानुकूलित सलून कोच जोडण्यात येणार आहे.  टॉय ट्रेनला जोडलेला वातानुकूलित सलून कोच हा आठ आसनी कोच असेल.  नेरळ ते माथेरान आणि परतीच्या प्रवासासाठी त्याच दिवशी तसेच रात्रीच्या मुक्कामासाठी बुकिंगसाठी उपलब्ध असेल.  नेरळ- माथेरान टॉय ट्रेन, जी 100 वर्षांहून अधिक जुनी आहे, ही भारतातील मोजक्या पर्वतीय रेल्वेंपैकी एक आहे. टॉय ट्रेनच्या वातानुकूलित सलूनमध्ये प्रवास करणे हा केवळ एक प्रकारचा अनुभवच नाही तर निसर्ग जवळून पाहण्याचा आणि माथेरानच्या नैसर्गिक वातावरणाच्या शांततेत मग्न होण्याचा थराराची भर पडेल. ट्रेनच्या वेळा आणि वातानुकूलित सलून कोचचे शुल्क खालीलप्रमाणे आहेतः


ट्रेनच्या वेळा कशा :


नेरळ ते माथेरान
ट्रिप-ए नेरळ प्रस्थान सकाळी 08.50 माथेरान आगमन  सकाळी 11.30 वाजता. 


ट्रिप-बी नेरळ प्रस्थान  सकाळी 10.25 माथेरान आगमन दुपारी 01.05 वाजता. 


 माथेरान ते नेरळ
 ट्रिप-सी माथेरान प्रस्थान दुपारी 02.45 नेरळ आगमन दुपारी 04.30 वाजता. 


 ट्रिप- डी माथेरान प्रस्थान दुपारी 04.00 नेरळ आगमन संध्याकाळी 06.40 वाजता. 


भाडे किती असेल ?
राऊंड ट्रिप त्याच दिवशी पूर्ण होईल: 
आठवड्यातील दिवस रु.  32,088 /- करासह 
आठवड्या अखेरीस रु. 44,608 /- करासह. 
त्याच दिवसाच्या राऊंड ट्रिपच्या प्रवासासाठी, ए+सी किंवा बी+डी यापैकी एकाचा पर्याय निवडता येतो.




रात्रीच्या मुक्कामासह राउंड ट्रिप: आठवड्यातील दिवशी रु. 32,088/- कर + रु. 1,500/- प्रति तास डिटेंशन शुल्कासह. 
आठवड्याअखेरीस रु. 44,608/- कर +  रु. 1,800/- प्रति तास डिटेंशन शुल्कासह
रात्रभर मुक्कामासह राउंड ट्रिप प्रवासासाठी, कोणताही एक ए किंवा बी आणि परतीचा पर्याय सी किंवा डी निवडू शकतो.


दहा हजार रुपये सुरक्षा ठेवीसह निवडलेल्या योजनेच्या एकूण भाड्याच्या 20 टक्के आगाऊ रक्कम भरून प्रवासाच्या तारखेच्या 7 दिवस आधी वातानुकुलीत एसी सलून बुक करू शकतात.  प्रवासाच्या तारखेच्या 48 तास आधी उर्वरित 80 टक्के रक्कम भरावी लागेल, तसे न केल्यास आगाऊ रक्कम आणि सुरक्षा ठेव जप्त केली जाईल आणि बुकिंग रद्द केली असे मानले जाईल.  48 तासांच्या आत बुकिंग रद्द केल्यास कोणताही परतावा दिला जाणार नाही.  मुख्य बुकिंग पर्यवेक्षक, नेरळ किंवा मध्य रेल्वेवरील कोणत्याही जवळच्या स्थानकांवर UPI, POS किंवा रोख रकमेद्वारे बुकिंग करता येते.  जर नेरळ व्यतिरिक्त इतर स्टेशनवर पैसे भरले असतील तर पैसे पावती क्रमांक नेरळ कार्यालयाला जमा केल्याच्या एका दिवसाच्या आत कळवावे.


आणखी वाचा :


Neral-Matheran Train : नेरळ-माथेरान मिनी ट्रेनची वेळ बदलली, जाणून घ्या सुधारित वेळापत्रक