तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात प्रवेश केल्यास त्यांना चपलेचा प्रसाद देऊ अशी धमकी हाजी अराफत शेख यांनी दिली आहे. त्यानंतर निलम गोऱ्हे यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे.
तृप्ती देसाई दर्ग्यात आल्यास चपलाचा प्रसाद देऊ : हाजी अराफात
"मुंबईच्या हाजी अली दर्ग्यात महिलांनी प्रवेश केल्यास त्यांना चपलेचा प्रसाद देण्यात येईल असं पत्रक शिवसेना नेते हाजी अराफत शेख यांनी प्रसिद्ध केले आहे. मात्र ही त्यांची वैयक्तिक भूमिका असून शिवसेनेची ही अधिकृत भूमिका नाही. मंदीर असो किंवा दर्गा, मशीद महिला पुरूष आणि सर्वांनाच समान अधिकार असावेत ही शिवेसनेची भूमिका आहे. पुरुषांना सर्व धार्मिक स्थळांमध्ये जे अधिकार आहेत ते सर्व स्रियांनाही असावेत. तसेच न्यायालयाने एकदा निर्णय दिल्यावर त्याची अंमलबजावणी सरकार आणि पोलीसांनी करायलाच हवी, ही वस्तूस्थिती आहे. सरकारकडून याच पालनाची अपेक्षा आहे. म्हणूनच महिलांच्या धार्मिक स्थळातील प्रवेशास कोणत्याही प्रकारे विरोध करणे योग्य नाही. हाजी अराफत शेख यांचं मत हे पक्षाचे अधिकृत मत नाही याची समज त्यांनाही पक्षाने दिलेली आहे" अशी भूमिका शिवसेना प्रवक्ता नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केली.