मुंबई : लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर वाढवायची गरज आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहे की लसीचा साठा मुबलक प्रमाणात असावा.  एक मेपासून 18 वर्षावरील व्यक्तींसाठी लसीकरणाचा टप्पा सुरू करत असतानाहे लसीकरण कुठेही खंड पडता सुरू ठेवावं लागेल. त्यासाठी सरकारने तशी पूर्तता केली तयारी केली आहे, अशी माहिती टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी दिली आहे. 


लसीचे केंद्र वाढवावे लागतील


एबीपी माझाशी बोलताना राहुल पंडित म्हणाले की, काल आणि आज लस मुबलक प्रमाणात मिळत नाही. मात्र पुढच्या चार-पाच दिवसात लसीकरण मोहीम चांगली चालवू शकू.  या टप्प्यामध्ये लसीकरण होत असताना अडचणी येणार नाहीत, असं मला वाटतं आणि अडचणी आल्या तरी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे अशा मागण्या केलेल्या आहेत जेणेकरून लस मुबलक मिळेल, असं पंडित यांनी सांगितलं. डॉ. राहुल पंडित यांनी सांगितलं की, लसीचे केंद्र वाढवावे लागतील शिवाय लोकांना व्यवस्थित पद्धतीने लस घेण्यासाठी आत मध्ये सोडावं लागेल.


आपण हर्ड इम्युनिटच्या जवळ सुद्धा नाहीत
सेरो सर्वेवर बोलताना ते म्हणाले की, मुंबईचा सेरो सर्वेचा रिझल्ट 36 टक्के पाहिला तर आपण हर्ड इम्युनिटच्या जवळ सुद्धा नाहीत.  लसीकरण मोहीम आणि पुढचा सेरो सर्वे जेव्हा करण्यात येईल. तेव्हा आपण सेरो पॉझिटिव्हिटी रेट 70 टक्के पर्यंत पोहोचू शकलो तर त्याचा निष्कर्ष आपण असा काढू शकतो की आपण हर्ड इम्युनिटी जवळ पोहोचलो. यामध्ये लस घेतलेले आणि कोरोना होऊन अँटिबॉडी तयार झालेले लोक असतील मग हा आकडा वाढेल, असं पंडित म्हणाले. 


खबरदारी आणि काळजी आपल्या हातात


कोरोना रुग्णसंख्यावाढीवर ते म्हणाले की, वॉशिंग्टन विद्यापीठाचा अभ्यास एक मॅथेमॅटिकल मॉडेल आहे. त्यामुळे ते खरं होईल ते खरं ठरेल असं होत नाही.  लोकांनी असे मॅथेमॅटिकल मॉडेल पाहून घाबरून जाऊ नये. घाबरलो आपल्याला आणखी त्रास होईल. जे निर्बंध ही खबरदारी घ्यायची ती जर आपण घेतली तर आपण रुग्ण संख्या नियंत्रणात सहजपणे आणू शकू.  आकडेवारीनुसार कुठे कधी रुग्ण संख्येचा पीक येईल हे तर कळेलच, पण खबरदारी आणि काळजी आपल्या हातात आहे,असं  डॉ. राहुल पंडित म्हणाले. 


आपण कपडे बदलतो तसे स्ट्रेन बदलत राहणार आहेत. प्रत्येकाची लक्षणे वेगळी असणार आहेत. पण कोरोना पासून बचाव करण्यासाठी चे नियम जी खबरदारी घ्यायची ते जर पाळली तर याची भीती बाळगण्याचे कारण नाही, डॉ राहुल पंडित म्हणाले.