मुंबई : अस्थ (ASTH) ही कुटुंबांना त्यांच्या सर्वाधिक कठीण काळामध्ये आवश्यक असेलला महत्त्वाचा आधार पुरविणारी भारताची पहिली व्यावसायिक प्रत्यावर्तन, अंत्यविधी (Funeral) सेवा आहे. स्वजनांना गमावण्याच्या गहिऱ्या भावनिक आव्हानाला ओळखून अस्थ दहनविधीशी संबंधित इत्यंभूत सेवा देऊ करते. शोकाकुल कुटुंबावरील दु:खाचा भार हलका करणे हा या सेवेचे लक्ष्य आहे. ही सेवा सध्या मुंबई, बेंगळुरू, दिल्ली एनसीआर आणि वाराणसीसह 30 शहरांमध्ये उपलब्ध आहे. अस्थद्वारे मृत्यूच्या ठिकाणापासून ते दहनभूमीपर्यंत लागणाऱ्या इत्यंभूत सेवा पुरविल्या जातात व या सर्व प्रक्रियेमध्ये प्रचंड संवेदनशीलता जपली जाते. प्रत्यक्षस्थळी तैनात असलेली संपूर्णतया समर्पित अशी टीम सर्व गोष्टींच्या प्रबंधाची संपूर्ण जबाबदारी घेते, ज्यामुळे कुटुंबियांना आपल्या प्रियजनांचा सन्मान जपण्यावर लक्ष केंद्रित करता येते. आपल्या मूळ गावापासून दूर आलेल्या, पवित्र ठिकाणी अंतिम संस्कार करण्याची इच्छा असणाऱ्या किंवा कठीण काळामध्ये या सेवांची तजवीज करण्यासाठी मदत हवी असणाऱ्यांना सहाय्य करण्याचे या सेवेचे उद्दीष्ट आहे.


रेड. हेल्थचे सीईओ आणि संस्थापक प्रभदीप म्हणाले, ''कोविड-19 पॅनडेमिकच्या काळात आप्तजनांना गमावण्याच्या काळात एकमेकांपासून दूर असलेल्या कुटुंबांच्या हृदय हेलावणाऱ्या अनुभवांमधून अस्थची निर्मिती झाली. तेव्हापासून आम्ही शेकडो शोकाकुल कुटुंबांना आधार दिला आहे, त्यांच्यासाठी, विशेषत: घरापासून दूर असलेल्यांसाठी हे अंतर मिटविण्याचा प्रयत्न केला आहे. रेड.हेल्थमध्ये आमचे ध्येय अगदी साधे आहे – कुटुंबांना जेव्हा मदतीची सर्वात जास्त गरज असते तेव्हा त्यांच्यासोबत तिथे हजर असणे, आणि त्यांच्यावरील भार हलका करणे, मग तो दिवस असो वा रात्र. अस्थ वेगवान सेवा, विश्वासार्हता आणि सहानुभूतीच्या आमच्या वचनाचे एक विस्तारित रूप आहे, जे प्रिय व्यक्तींच्या जाण्याचे दु:ख सहन करताना कुणीही एकटं असू नये याची काळजी घेण्यासाठी आकारास आले आहे.”


अस्थ विविध चालीरीती आणि प्राधान्यक्रमानुसार अनेक पर्याय पुरविते, ज्यात वैविध्यपूर्ण सांस्कृतिक आणि धार्मिक गरजांचा आदर राखला जातो. पवित्र स्थळी अंतिम संस्कार करण्याचे महत्व लक्षात घेऊन ही सेवा वाराणसी, गया आणि त्रिवेणीसारख्या पवित्र ठिकाणी अस्थीविसर्जनास मदत करते. कौटुंबिक परंपरांनुसार अंतिम संस्कार करण्यासाठी अस्थच्या अनुभवी व्यावसायिकांच्या टीममध्ये विविध भाषिक आणि धार्मिक पार्श्वभूमीच्या (जसे की हिंदी, तमिळ, तेलुगू, कानडी इत्यादी) पंडितांचा समावेश आहे. यात अर्थी, वस्त्र, फुले, मातीचे मडके आणि पूजेचे सामान अशी अंतिम संस्कारासाठी आवश्यक सामग्री पुरवली जाते.


हेही वाचा


आधी म्हैस, आता महागडी कार, गाडीचा नंबरही जोरदार;'गोल्ड'न बॉय अरशदला मरियम नवाज यांचं स्पेशल गिफ्ट