मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुंबईत शिवसेना खासदार संजय राऊतांविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांचा सत्कार संजय राऊतांच्या हस्ते होणार आहे, त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून संजय राऊतांविरोधात घोषणाबाजीही सुरू आहे. या निदर्शनाविरोधात सनातननेही राष्ट्रवादीविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध सनातन असं आंदोलन रंगलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘संजय राऊत हाय हाय’च्या घोषणा देण्यात आल्या, तर सनातनकडून ‘राष्ट्रवादी चोर है’ अशा घोषणा दिल्या. या घोषणाबाजी आणि आंदोलनाचा फटका संजय राऊत यांनाही बसला. गर्दीतून त्यांना वाट काढत जावं लागलं.
हिंदुत्त्ववादाची प्रखर बाजू मांडणारे आणि हिंदुत्त्ववाद्यांना निःशुल्क सहाय्य करणाऱ्या संजीव पुनाळेकर यांचा राष्ट्रीय पत्रकार मंचाच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे. संजय राऊत यांच्या हस्ते हा सत्कार होईल.
संजय राऊतांच्या हस्ते सनातनच्या वकिलाचा सत्कार, राष्ट्रवादीची निदर्शने
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Oct 2018 05:07 PM (IST)
सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांचा सत्कार संजय राऊतांच्या हस्ते होणार आहे, त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -