Nawab Malik Tweet : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)यांनी ट्वीट करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना टोला लगावला आहे. सकाळी ट्वीट करत नवाब मलिक यांनी फडणवीसांचे नाव न घेता म्हटलं आहे की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय एजन्सींना माझ्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात खूप रस दाखवत आहेत. मी असं सुचवतो की त्यांनी स्वत:ची नियुक्ती ओएसडी म्हणून करावी. त्यांना मुख्यमंत्री म्हणून अशा नियुक्ती करण्याचा भरपूर अनुभव आहे आणि किरीट सोमय्या प्रवक्ता म्हणून नियुक्ती करावी, असं मलिकांनी म्हटलं आहे.
नवाब मलिक यांनी बीडच्या आष्टीत बोलताना म्हटलं आहे की, मी कोणालाही घाबरणार नाही. भाजप हे महाराष्ट्रातील 'चोरों का बाजार' आहे. किरीट सोमय्या हे त्याचे बँड, बाराती आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करणार असंही ते म्हणाले.
नवाब मलिक (Nawab Malik)यांनी काल ट्वीट करत काही ऑफिशल पाहुणे आज सकाळी माझ्या घरी अचानक येणार आहे असं म्हणलं होतं. या पाहुण्यांचं मी चहा बिस्कीट देऊन मोठ्या मनाने आदरातिथ्य करेन. त्यांना योग्य पत्ता हवा असेल तर मला फोन करावा असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- आर्यन खानच्या किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज तर समीर वानखेडे पार्टनर, नवाब मलिकांचा मोठा आरोप
- क्रुझ पार्टीतील 'त्या' तीन लोकांना सोडण्यातच सर्वात मोठा खेळ; नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट
- नवाब मलिकांकडून ऑडियो क्लिप ट्वीट, सॅनविल आणि NCB अधिकाऱ्यातील संवाद, नेमकं काय आहे त्यात...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha